Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘माझी मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगली दिसते’, म्हणणाऱ्या युजरला स्वरा भास्करची खणखणीत चपराक

‘माझी मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगली दिसते’, म्हणणाऱ्या युजरला स्वरा भास्करची खणखणीत चपराक

बॉलिवूड विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. त्या सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर त्यांचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र, अनेकवेळा त्यांना युजर्स ट्रोल करतात. अशावेळी अभिनेत्री देखील त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत असतात. याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. तिचा चित्रपट असो किंवा तिचे कोणतेही विधान असो, ती वादाच्या भोवऱ्यात असतेच. एक तर स्वरा स्वतःच वादात उडी घेते किंवा वाद तिची साथ सोडत नाहीत, असे अनेकदा दिसून आले आहे. याच कारणामुळे स्वरा अनेकदा चर्चेत असते.

पुन्हा एकदा स्वराच्‍या एका फोटोवर युजरने कमेंट केली की, स्वरा स्वतःला उत्तर देण्‍यापासून रोखू शकली नाही. युजरची कमेंट आणि स्वराचे उत्तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

स्वराने साडीतील फोटो केला शेअर
स्वरा भास्करने तिच्या ट्विटर अकाऊंटवर साडी नेसलेला एक फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत स्वराने कॅप्शन लिहिले की, “एक साडी, एक पार्क, एक वॉक, एक पुस्तक… शांततेत हे सर्व अनुभवले पाहिजे.”

युजर्सने म्हणाले- मोलकरीण चांगली आहे
हा फोटो पाहून एका युजरने लिहिले की, “माझी मोलकरीण तुझ्यापेक्षा साडीत छान दिसते. तुझ्यापेक्षा खूप सुंदर.”

स्वराने दिले जोरदार उत्तर
युजरला उत्तर देताना स्वरा भास्करने लिहिले की, “मला खात्री आहे की, तुमची घरगुती सहायिका सुंदर आहे. मला आशा आहे की, तुम्ही तिच्या मेहनतीचा आणि तिच्या प्रतिष्ठेचा आदर कराल आणि तिच्याशी गैरवर्तन करणार नाही.”

युजर्सनी आधीच उडवली आहे स्वराची खिल्ली
युजर्सकडून वाईट कमेंट्स स्वरासाठी सामान्य झाल्या आहेत. याआधीही स्वरा फोटोमुळे प्रचंड ट्रोल झाली आहे. अलीकडेच, वोग मॅगझिनवरील स्वरा भास्करच्या कव्हर फोटोमुळे तिची खिल्ली उडवली गेली. यानंतर स्वराने तिच्या उत्तराने सर्वांची तोंडे बंद केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा