Monday, November 25, 2024
Home टेलिव्हिजन ‘आता मी कपडेच घालणार नाही’ कॅमेरामनच्या ‘त्या’ मागणीवरुन संतापलेल्या उर्फी जावेदने स्पष्टच सांगितले

‘आता मी कपडेच घालणार नाही’ कॅमेरामनच्या ‘त्या’ मागणीवरुन संतापलेल्या उर्फी जावेदने स्पष्टच सांगितले

हिंदी मनोरंजन जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच  सर्वात जास्त चर्चेत असतात.यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed). नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने उर्फी जावेद माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसत असते. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे तर चर्चेत असतेच, पण सध्या ती तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काय म्हणाली ती नेमकं चला जाणून घेऊ. 

उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे बर्‍याचदा प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या उर्फीच्या विवादित वक्तव्यांचीही नेहमीच चर्चा होताना दिसत असते. सध्या चित्रपट, मालिका, वेब सिरीज आणि मोठमोठे म्युझिक व्हिडिओ यापासून दूर असली तरी उर्फी आजही चर्चेत असते. नुकतेच एवढे मोठे विधान दिले आहे, जे ऐकल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर ट्रोलर देखील हैराण झाले आहेत.

उर्फी जावेद तिच्या विवादीत वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. पण सध्या तिने असे काही वक्तव्य केले आहे ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अलिकडेच उर्फीने माध्यमांसमोर हे धक्कादायक वक्तव्य केले आहे. नेहमी प्रमाणे उर्फीचे फोटो घेण्यासाठी माध्यमांनी गर्दी केली होती. याचवेळी एका कॅमेरावाल्याने उर्फीला तिच्या कपड्यांबद्दल विचारणा केली. तेव्हा उर्फीने “मी एक दिवस कपडेच घालणार नाही विषय संपला. रोज काय सरप्राईज देऊ.मी कोणालाही सरप्राईज देण्यासाठी असे कपडे घालत नसून मी माझ्या मनात येईल ती घालते,” असे म्हणत सर्वांचीच बोलती बंद केली.

दरम्यान, उर्फीच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. परंतु आपल्या विवादीत वक्तव्यामुळे चर्चेत येण्याची उर्फीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे उर्फीला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वीच उर्फीने उदयपुर घटनेबद्दल सोशल मीडियावरुन निषेध व्यक्त केला होता. ज्यामुळे तिच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती. इतकचे नव्हेतर उर्फीच्या मृत्यूच्या अफवाही सोशल मीडियावर उठवण्यात आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा