प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या चाहत्यांमध्ये, तिच्या नवीन गाण्यांची प्रचंड उत्सुकता असते. नुकतेच सपना चौधरीचे ‘घाघरा’ हे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. प्रत्येक गाण्याप्रमाणेच तिचे हे गाणेही सर्वत्र धमाल करत आहे. आता सपनाने या गाण्यावरचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. जो चाहत्यांकडून सातत्याने पाहिला जातोय.
सपनाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या घरात नाचाताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सपनाचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. जो आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. या डान्स व्हिडिओवर सपनाचे चाहते प्रचंड लाईक्स देत आहेत आणि कमेंटही करत आहेत. सपनाची लोकप्रियता इतकी आहे की, या गाण्यावर आतापर्यंत एक लाख ९४ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.
‘घागरा’ या गाण्याला हरियाणवी गायिका रुचिका जांगिडेने आपला आवाज दिला आहे. सपना चौधरीवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरी दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या शिखरावर चढत आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ दरदिवशी इंटरनेटवर धमाल करत असतात.
आज सपना चौधरीचे चाहते फक्त हरियाणापुरतेच मर्यादित नाहीत, तर तिचा डान्स पाहण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून प्रेक्षक येत असतात. जेव्हा सपना तिचा डान्स दाखवते, तेव्हा ती प्रेक्षकांनाही तिच्या तालावर नाचायला भाग पाडते. आज सपनाच्या डान्सचे कोट्यवधीचे चाहते आहेत. स्टेजवर तिचा डान्स पाहण्यासाठी हजारो लोक जमतात.