बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानची मुलगी इनाया बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय मुलांपैकी एक आहे. करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खानप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. जेव्हा इनायाचा एखादा व्हिडिओ शेअर केला जातो, तेव्हा थोड्या वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतो. नुकतेच सोहा अली खानने तिचा पती कुणाल खेमू आणि मुलीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने सांगितले आहे की, सकाळी सकाळी कुणाल आणि इनाया काय करतात.
सोहा अली खानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सकाळचे 6 वाजले आहेत. या व्हिडिओमध्ये कुणाल आणि इनाया डान्स करताना दिसत आहेत. या आधी इनाया झोपेतून उठते आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर ती कुणालला काहीतरी सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रेक्षक तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. (Soha Ali Khan share video of kunal khemmu dance with daughter innaya in early morning)
हा व्हिडिओ 7 जुलैचा आहे. हा व्हिडिओ शेअर करून सोहा अली खानने कॅप्शन दिले की, “आमच्या घरात सकाळी सकाळी साडे सहा वाजता.”
या व्हिडिओमध्ये आपल्या वडिलांना डान्स करताना पाहून इनाया देखील त्याच्या स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. यामध्ये बॅकग्राउंडला एक गाणे चालू आहे. यावर कुणाल आणि इनाया मस्ती करत डान्स करताना दिसत आहे. कुणाल देखील त्याच्या मुलीप्रमाणे लहान होऊन डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
प्रेक्षकांना बाप-लेकीचा डान्स आणि त्यांचे बॉंडिंग खूप आवडले आहे. सगळे या व्हिडिओवर चाहते आणि कलाकार कमेंट करून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. श्वेता बच्चनने “मोहक” अशी कमेंट केलीय, तर दिया मिर्झाने कमेंटमध्ये लव्ह इमोजीचा वापर केला आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की, “हे खूपच गोड आहे. बाप लेकीचे हे बॉंडिंग अद्भुत आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “आज सोशल मीडियावर पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे.” आणखी एका युजरने लिहिले आहे की, “खूप छान देव तुम्हा दोघांना नेहमी सुखात ठेवो.”
त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत १२ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…