Wednesday, January 28, 2026
Home बॉलीवूड सोहा अली खानने लेकीसोबत सुरू केली दिवाळीची तयारी, दिवे रंगवणाऱ्या क्युट इनायाने वेधले लक्ष

सोहा अली खानने लेकीसोबत सुरू केली दिवाळीची तयारी, दिवे रंगवणाऱ्या क्युट इनायाने वेधले लक्ष

हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री म्हणून सोहा अली खान ओळखली जाते. सध्या ती चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. नुकताच सोहा अली खानने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिवाळी सणाची तयारी सुरू झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोहाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी सुद्धा भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या इंडस्ट्रीमधून गायब असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. मुलगी इनाया खेमूसोबत ती अनेक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच सोहाने मुलगी इनायासोबतचा क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती तिच्या मुलीसोबत दिवाळी सणाची तयारी करत आहे.

सोहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मुलगी इनायासोबत ती पणत्यांना रंग देताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, इनाया या फोटोमध्ये पाठमोरी बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करत सोहाने ‘दिवाळीच्या तयारीची सुरुवात’ असे सांगितले आहे. सोहा आणि इनायाचा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. फोटोला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले असून अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत.

दरम्यान सोहाने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटात काम केले आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल मांगे मोअर’ चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील भूमिकेने तिला जोरदार लोकप्रियता मिळाली. सोहा २५ जानेवारी २०१५ मध्ये अभिनेता कुणाल खेमूसोबत विवाह बंधनात अडकली. त्यानंतर २०१७ मध्ये तिने मुलीला जन्म दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा