बॉलिवूडमध्ये येऊन आपली एक वेगळीच ओळख बनवणे सोप्पे काम नाहीये. एक कलाकार म्हणून काम करण्यापासून ते अगदी नावाजलेला कलाकार बनेपर्यंत प्रत्येकाला खूप परिश्रम करावे लागतात. तेव्हा जाऊन ते त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण करू शकतात. आज भलेही अनेक कलाकारांकडे मोठमोठ्या गाड्या असतील, अनेक बंगले असतील, पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना अगदी कमी पगारात काम करावे लागत होते. त्यांचा पहिला पगार ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घेऊया बॉलीवूडमधील अशाच काही दिग्गज कलाकारांबद्दल
शाहरुख खान
बॉलिवूडमधील किंग खानचा पहिला पगार ५० रुपये एवढा होता,जो त्याला गायक पंकज उधास यांच्या एका कार्यक्रमात मिळाला होता. शाहरुख खान हा चित्रपट सृष्टीमध्ये येण्याआधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. त्याने ‘फौजी’ या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते.
अमिताभ बच्चन
बॉलिवूड मधील महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर खूप नाव कमावले आहे. पण त्याआधी त्यांच्याकडे काहीच नव्हते. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एकदा अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, सुरुवातीला त्यांना ५०० रुपये एवढा पहिला पगार मिळाला होता. पण आज त्यांच्याकडे नाव, पैसा, इज्जत या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी सगळे त्यांच्या कष्टाने कमावले आहे.
अक्षय कुमार
बॉलिवूडमध्ये एखादा ऍक्शन सीन असो किंवा कॉमेडी असो,रोमान्स असो किंवा कोणताही सामाजिक संदेश द्यायचा असो, ही सगळी पात्र सुरळीत पार पाडणारा बॉलीवूडमधील अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. आज तो सगळ्यात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. याच अक्षय कुमारचा पहिला पगार केवळ १५०० रुपये एवढा होता.
ऋतिक रोशन
ऋतिक रोशनची पहिली कमाई १०० रुपये एवढी होती. तेव्हा त्याने बाल कलाकार म्हणून ‘आशा’ या चित्रपटात काम केले होते. त्यावेळी त्याला त्याच्या कामासाठी १०० रुपये मिळाले होते.
आमिर खान
बॉलिवूड मधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’. या चित्रपटात त्याला दर महिन्याला १०० रुपये एवढा पगार मिळत असे. वृत्तपत्रांच्या माहितीनुसार ,आमिर त्याचा सगळा पगार त्याच्या आईला देत असे.










