अशा काही अभिनेत्री, ज्यांच्या पतीने केलंय दुसरं लग्न; घटस्फोट झाल्यानंतर आज एकटे जगतायेत त्या आयुष्य


मनोरंजन हे एक असे क्षेत्र आहे. जिथे नाती जुळली आहेत हे आपल्याला समजण्याआधीच ती नाती तुटतात. कोणाचे लग्न झाले, ब्रेकअप झाले तर कधी कोणाचा घटस्फोट झाला, या बातम्या बॉलिवूडमधून नेहमीच येत असतात. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक उतार-चढाव येत असतात. यात नेमके काय घडेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न केले पण त्यांचे लग्न सफल झाले नाही आणि आता ते वेगळे आयुष्य जगत आहेत.(Some bollywood actress who live their life alone after divorce)

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या घटस्फोटाचे दुःख झेलले आहे. त्या आता स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. अनेक वर्ष एकत्र राहूनही त्यांच्या संसाराची गाडी काही चालली नाही. त्यामुळे आता त्या वेगळ्या राहतात. घटस्फोट झाल्यावर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन पुन्हा लग्न केले पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी पुन्हा लग्न केले नाही. आज त्या एकट्याच त्यांच्या मुलांचे पालन पोषण करत आहेत. आज आपण जाणून घेऊयात त्या अभिनेत्रींबाबत ज्यांचा घटस्फोट झाला आहे, पण आजही त्या एकट्या त्यांच्या मुलांचे पालन पोषण करत आहेत.

करिश्मा कपूर
करिश्मा कपूर ही बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे, जिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना तिच्याकडे आकर्षित केले. करिश्मा कपूरने २००३ मध्ये दिल्लीमध्ये राहणाऱ्या व्यावसायिक संजय कपूरशी विवाह केला होता. लग्नाच्या ११ वर्षानंतर त्यांचे नाते तुटले. करिश्माला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी समायरा आणि मुलगा कियान, ज्यांचे पालन पोषण ती आज एकटी करत आहे. परंतु संजय कपूर मात्र त्याच्या आयुष्यात पुढे सरकला. त्यांच्या घटस्फोटानंतर काही महिन्यातच संजय कपूरने मॉडेल प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केले. संजय आणि प्रियाला देखील एक मुलगा आहे.

अमृता सिंग
ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही की, अमृता सिंग जेवढी चांगली अभिनेत्री आहे तेवढीच चांगली एक आई आहे. अमृता सिंगने १९९१ साली सैफ अली खानसोबत लग्न केले होते. अमृता ही सैफ अली खानपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. २००४ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांनतर पूर्ण आयुष्य अभिनेत्रीने एकटी राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या दोन्ही मुलांचा तिने सांभाळ केला. सैफ आणि अमृतामध्ये आज कितीही वाद असले तरीही, तिच्या मुलांना ती वडिलांच्या प्रेमापासून वंचित ठेवत नाही. त्यांना केव्हाही सैफकडे जाण्याची परवानगी आहे. सैफ अली खानने त्यानंतर २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. त्या दोघांना २ मुलं आहेत.

जेनिफर विंगेट
जेनिफरचे चाहते तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे देखील दीवाने आहेत. ‘बेहद’ मालिकेत नकारात्मक भूमिका निभावून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात मात्र जेनिफर प्रेमापासून वंचित आहे. तिने तिचा सह-कलाकार करण सिंग ग्रोवरसोबत २०१२ मध्ये लग्न केले होते. परंतु केवळ २ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. माध्यमातील वृत्तानुसार, करणने बिपाशा बसूसाठी जेनिफरला धोका दिला होता. घटस्फोट झाल्यानंतर करणने बिपाशासोबत लग्न केले. पण जेनिफर एकटी आयुष्य काढत आहे. ती तिच्या करिअरवर फोकस करत आहे.

पूजा बेदी
पूजा बेदी हिने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका निभावली आहे. तिने १९९४ साली व्यावसायिक फरहान फर्निचरवाला याच्याशी लग्न केले. ९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर २००३ साली त्या दोघांचा काडीमोड झाला. पूजा बेदीसोबत घटस्फोट झाल्यानंतर फरहानने फिरोज खानची मुलगी लैला खान हिच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील आहे. पूजा आणि फरहानला दोन मुलं आहेत. मुलगी आलिया फर्निचरवाला आणि मुलगा उमर फर्निचर वाला.

श्वेता तिवारी

 

‘कसोटी जिंदगी’ मधील प्रेरणाचे लग्न तर ऑनस्क्रीन सफल झाले. पण ऑफस्क्रीन तिचे लग्न असफल झाले आहे. श्वेताने तिच्या आयुष्यात दोन वेळा लग्न केले, पण तिची दोन्ही लग्न मोडली. तिचे पाहिले लग्न राजा चौधरी याच्याशी झाले होते. परंतु तिने त्याच्यावर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१३ साली तिने अभिनेता अभिनव कोहलीसोबत लग्न केले. परंतु त्यांचेही लग्न लग्न टिकू शकले नाही. श्वेताने तिच्या मुलाच्या कस्टडीसाठी कोर्टात केस लढली होती. ती आता तिच्या पतीपासून वेगळी राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’


Leave A Reply

Your email address will not be published.