Wednesday, July 3, 2024

रात्री उशिरा मुंबईतील रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाले ‘बिग बी’; चाहत्यांच्या चिंतेत वाढ

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. काही दिवसांतच ते ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. परंतु याच दरम्यान बिग बींच्या कुटुंबियांवर सध्या एक संकट ओढवलेले पाहायला मिळत आहे. ते म्हणजे ‘बिग बीं’चा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याला दुखापत झाली आहे आणि अभिषेक बच्चनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे बच्चन कुटुंब यावेळी खूपच अस्वस्थ आहे. तर नुकतेच वडील अमिताभ बच्चन देखील अभिषेकला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या काही फोटोंमध्ये अभिषेक बच्चनच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून, त्याचा हाताला बांधलेले दिसत होते. तसेच त्याच्या बोटांवर अनेक पट्ट्या देखील होत्या. शिवाय त्याच्या आरोग्याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

त्याच दरम्यान अमिताभ बच्चन रुग्णालयामधून बाहेर पडताना दिसले. त्यांनी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. यामध्ये बिग बी नेहमीप्रमाणे धडाकेबाज दिसत होते. त्याचबरोबर बिग बी यावेळी खूप अस्वस्थ देखील वाटत होते.

या दरम्यान अमिताभ बच्चन सोबत त्यांचे अंगरक्षकही दिसले होते. त्याचबरोबर अभिषेकची बहीण श्वेता देखील रुग्णालयाच्या बाहेर दिसून आली. श्वेता कारमध्ये बसलेली होती. ती तिच्या वडिलांसोबत तिच्या भावाला भेटायला आली होती. अमिताभ बच्चन आणि मुलगी श्वेता रविवारी रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालया आले होते. त्याच दरम्यान श्वेता देखील कॅज्युअल व्हाईट टॉपमध्ये दिसली होती. ते दोघेही एकत्रच कार मधून घरी गेले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा