Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते सोना मोहपात्रा, आजही तिचे ‘हे’ वाद असतात चर्चेत

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते सोना मोहपात्रा, आजही तिचे ‘हे’ वाद असतात चर्चेत

सोना मोहपात्रा (Sona Mohpatra) ही बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. तिने आपल्या संगीत कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली आहेत. १९७६ मध्ये जन्मलेली सोना दरवर्षी १७ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. यावेळी आज ती तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट गायकांच्या यादीत सोनाच्या नावाचा समावेश होतो, पण गाण्यांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहते. नेहमी मोकळेपणाने बोलणाऱ्या सोनाने आतापर्यंत अशी अनेक खळबळजनक विधाने केले आहेत, ज्यावरून जोरदार वाद झाला आहे. आज तिच्या वाढदिवशी, जाणून घेऊया तिच्याशी संबंधित पाच वाद.

MeTooचा केला होता आरोप
सोना मोहपात्रा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. याच कारणामुळे ती अनेकदा चर्चेत येते. MeToo चळवळीदरम्यान सोनाने संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. सोनाने ट्विटरवर बोलताना कैलाश खेर आणि अनु मलिक यांच्यावर अनुचित वर्तनाचा आरोप केला होता. दरम्यान, सोनू निगम या दोघांची बाजू घेत होता, तेव्हा सोनाला त्याच्यावरही राग आला. ट्विटरच्या माध्यमातून तिने सोनूवरही जोरदार निशाणा साधला होता. (sona mohapatra birthday today know untold facts about singer)

जेव्हा गाण्यामुळे मिळाली धमकी
सोना केवळ वक्तव्यांमुळेच नाही, तर गाण्यांमुळेही वादात सापडली आहे. खरं तर, एका गाण्यामुळे तिला मदारिया सुफी फाऊंडेशनकडून धमक्या येत असल्याचा खुलासा या गायिकेने केला होता. सोनाच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या सूफी गाण्यांमुळे ही धमकी मिळत होती. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

सलमानवर साधला आहे निशाणा
सोनाने बॉलिवूडचा दबंग सलमान खानवरही जोरदार निशाणा साधला होता. ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला. सलमानने सोशल मीडियावर सांगितले होते की, त्याच्या ‘भारत’ चित्रपटाचे शूटिंग आता संपले आहे. सलमानच्या ट्विटनंतर काही वेळातच सोनाने ट्विट केले आणि लिहिले, “प्रिय ट्विटर! मी या व्यक्तीला फॉलो करत नाही. या व्यक्तीचे ट्विट माझ्या टाइमलाइनवर दिसावेत, असे मला वाटत नाही. मी तुम्हाला माझ्या टाइमलाइनवरून ही जाहिरात ट्विट काढून टाकण्याची विनंती करतो.” या ट्विटनंतर सिंगरला खूप ट्रोल करण्यात आले होते.

लिंग भेदभावाचा मुद्दा
लिंगभेदासारख्या मुद्द्यांवरही सोना बोलली आहे. तिने आपला राग मूड इंडिगो या देशातील प्रतिष्ठित संस्था, आयआयटी बॉम्बेच्या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या आयोजकांवर काढला होता. सिंगरने फेसबुकवर आयआयटी बॉम्बेला एक खुले पत्र पोस्ट केले असून, त्याच्यावर लैंगिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा