Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड ‘या’ कारणामुळे नेटकऱ्यांवर संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली ‘आई वडिलांपेक्षा तुम्हालाच जास्त काळजी’

‘या’ कारणामुळे नेटकऱ्यांवर संतापली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली ‘आई वडिलांपेक्षा तुम्हालाच जास्त काळजी’

दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असा खुलासा केला होता, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची हिऱ्याची अंगठी फ्लॉंट करत आहे. यासोबतच तिच्या जवळ एक व्यक्ती उभी होती, ज्याचा चेहरा लपला होता, पण सोनाक्षीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले होते. या फोटोनंतर सोनाक्षी सिन्हाच्या प्रेमप्रकरणाच्या जोरदार चर्चा सिने जगतात रंगल्या होत्या. यामुळेच अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

सोनाक्षी सिन्हा ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र सध्या सोनाक्षी तिच्या कथीत प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. इतकेच नव्हेतर तिला याबद्दल सारखे विचारले जात असल्याने तिने चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आणि सांगितले की लोक तिच्या पालकांपेक्षा तिच्या लग्नात आणि डेटिंगमध्ये जास्त रस घेत आहेत.

अभिनेत्री म्हणाली, “माझ्याबद्दल बोलले जात असेल तर मी माझ्या वैयक्तिक आयुष्याऐवजी माझ्या कामाबद्दल बोलण्यास प्राधान्य देईन, असे मी नेहमीच म्हटले आहे. पण अर्थातच, लोक उत्सुक आहेत. त्यांना माझ्यामध्ये काय चालले आहे हे जाणून घ्यायचे आहे. जोपर्यंत मी माझे जीवन जगासोबत सामायिक करण्यास तयार नाही तोपर्यंत मी असे करणार नाही. मी नेहमीच अशा प्रकारचे आयुष्य जगले आहे आणि माझ्या सोशल मीडियावरही ते स्पष्टपणे दिसत आहे. मी हे जग आहे मी फक्त मला जे हवे आहे ते  सर्वांसमोर जाहीर करेन आणि आणखी काही नाही.” दरम्यान सोनाक्षी सिन्हाने सलमान खानसोबत दबंग चित्रपटात काम केले होते. ज्यामुळे ति सर्वत्र लोकप्रिय ठरली होती.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच Roar मधून तिचे OTT पदार्पण करणार आहे. याशिवाय काकुडा हा हॉरर कॉमेडी चित्रपटही चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा