Monday, July 1, 2024

‘ब्युटी इन ब्लॅक!’ सोनाक्षी सिन्हाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

कलाकारांचे फोटोशूट नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सर्वच कलाकार अगदी नेहमी त्यांचे वेगवेगळे फोटोशूट करून घेतात. या फोटोशूटमध्ये कधी वेस्टर्न, कधी इंडियन, कधी फ्युजन असे वेगवेगळ्या अवतारातील त्यांचे फोटोशूट नेहमी गाजते. या फोटोशूटमुळे देखील कलाकार प्रकाशझोतात येतात. सोशल मीडियावरही त्यांची फोटोशूटमुळे खूप चर्चा होते. कलाकारांच्या या फोटोशूटचे काही निवडक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचे एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

सोनाक्षीने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये तिने तिचे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षी तिच्या या नवीन फोटोंमध्ये एकदम आकर्षक आणि मादक दिसत आहे. तिच्या लुकला तिचे डोळे कॉम्प्लिमेंट करत आहे. सोनाक्षीने या फोटोशूटमध्ये एकदम नॅचरल मेकअप केला असून, तिचा मेकअप तिच्या हाय पोनीमध्ये अधिक उठावदार दिसत आहे. तिच्या फोटोशूटमधील आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे तिचे कानातले आणि मोठी अंगठी. सध्या सोनाक्षीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक कमेंट्स येत असून, सोनाक्षीच्या लूकचे कौतुक होत आहे. अनेकांनी तिला ती आता जास्त स्लिम झाल्याचे देखील सांगितले आहे. (Sonakshi Sinha showed stylish style in black outfit )

सोनाक्षीने २०१० साली सलमानच्या दबंग सिनेमातून अभिनयात दमदार पदार्पण केले. त्यावेळी सोनाक्षीवर तिच्या वजनावरून खूप टीका देखील करण्यात आली. मात्र सोनाक्षीने हळूहळू तिचे वजन कमी केले. या नवीन फोटोंमध्ये ती अधिकच ग्लॅमरस आणि स्लिम दिसत आहे. मागच्या वर्षी कोरोना काळात तिने तिचे वजन कमी करण्यावर लक्ष दिले. इंडस्ट्रीमध्ये कदाचित सोनाक्षी पहिली अशी अभिनेत्री असेल जिचा पहिल्याच सिनेमातील संवाद तुफान हिट झाला.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय ती रितेश देशमुखसोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूट्यूबवर ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने केला राडा! नोरा फतेहीच्या डान्सने पुन्हा एकदा जिंकली प्रेक्षकांची मनं

-दीपिकाने अंगावर काटा आणणारा, भयावह व्हिडिओ केला शेअर; नेटकऱ्यांकडून आगामी चित्रपटाबद्दल लावला जातोय अंदाज

-व्हायरल व्हिडिओला प्रतिक्रिया देत, धर्मेंद्र यांनी नातू करण देओलचे केले कौतुक; म्हणाले, ‘तू तुझ्या पंजीसारखा…’

हे देखील वाचा