Thursday, July 18, 2024

इमरान हाश्मीची ‘ही’ अभिनेत्री सुपरस्टार नागार्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर, ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) ‘द घोस्ट’ हा सिनेमा करत आहे. या सिनेमासाठी मेकर्स एका अभिनेत्रीच्या शोधात होते. या सिनेमासाठी पहिल्यांदा काजल अग्रवालला (Kajal Agarrwal) घेण्यात आलं होतं. परंतु तिच्या प्रेग्नेंसीमुळे तिने हा सिनेमा नाकारला. त्यानंतर अमला पॉल (Amla Paul) आणि मेहरीन कौर पिरजादा यांना देखील विचारण्यात आलं होतं. परंतु काही आर्थिक व्यवहार न जुळल्यामुळे तिने हा सिनेमा केला नाही. त्यानंतर जॅकलीन फर्नांडिसच (Jacquline नाव समोर येत होतं परंतु काही त्यामुळे तिलाही टाळण्यात आल.

आता या सिनेमासाठी नागार्जुनसोबत नक्की कोणती अभिनेत्री दिसणार आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला. नागार्जुनसोबत ‘द घोस्ट’ या सिनेमात सोनल चौहान (Sonal Chauhan) हिचा विचार केला जात आहे. चार अभिनेत्रींच्या नकारानंतर सोनल चौहानला फायनल करण्यात आल आहे. परंतु याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.

सध्या सोनल चौहान ‘F3 : फन अँड फ्रस्ट्रेशन ‘या तेलगू सिनेमामध्ये व्यस्त आहे. सिनेमामध्ये ती वरुण तेजसोबत दिसणार आहे. यात दग्गुबती वेंकटेश देखील मुख्य भूमिका निभावत आहेत. सोनलने आपल्या अभिनयाची सुरुवात इम्रान हाश्मीच्या (Emraan Hashmi) ‘जन्नत’ या सिनेमापासून केली. या सिनेमामध्ये जोया माथुर ही व्यक्तिरेखा तिने साकारली होती. हिंदी सिनेमानंतर तिने टॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ‘रेनबो’ हा तिचा पहिला तेलगू सिनेमा होता. त्यानंतर तिने तमिळ आणि कन्नड भाषेतही काम केले.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा