मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होय. सोनाली या दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचे फोटो ती आजकाल सातत्याने शेअर करत असते. मागील काही दिवसात ती तिच्या पतीसोबत मालदीवला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने शेअर केले होते. सध्या ती एक सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे. अशातच तिचा एक क्लासी लूक समोर आला आहे. तिचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने तपकिरी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबत तिने गळ्यात हिरव्या रंगाची ज्वेलरी घातली आहे. तिने हातात बांगड्या आणि नाकात स्टायलिश नथ घातलेली आहे. तसेच तिने पायात मोझडी घातलेली आहे. एका फोटोमध्ये तिने बॅग घेतलेली दिसत आहे. (sonalee kulakrni’s classy look viral on social media)
हा फोटो शेअर करून तिने “नथीचा नखरा,” असे कॅप्शन दिले आहे.
तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने “उफ्फ,” अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेता हेमंत ढोमे याने कमेंट केली आहे की, “अर्रर्रर्र कसं होणार पोरांचं आता? घोडे फरार.”
सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका
-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ










