Tuesday, July 9, 2024

साडीत खुलून आलं अप्सरेच सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे साडीतील पाच खास फोटो

मराठी सिनेमाप्रेमींमध्ये लावणीची एक वेगळी क्रेझ असते. अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला लावणी पाहायला मिळते. लावणी ही देशात महाराष्ट्राची ओळख आहे. अशाच एका प्रसिद्ध ‘अप्सरा आली’ या लावणीवर नृत्य करत सोनाली कुलकर्णी महाराष्ट्रातील घरांघरात पोहचली व सर्वांची लाडकी अभिनेत्री झाली.

विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या सशक्त भूमिका साकारत सोनालीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सोनाली ही सध्या ‘झी मराठी’वरील ‘डान्सिंग क्वीन साइज लार्ज- फुल चार्ज’ या डान्सिंग रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहात आहे. या शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स न करण्याचा निर्णय घेतला होता. मराठीच्या प्रचार प्रसारासाठी सोनाली सतत काम करत असते.

मराठी अभिनेत्रीपैकी सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर ऍक्टिव राहण्यात सर्वात पुढे असते. त्यामुळेच ती तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे खूपच चर्चित असते. तसेच चाहत्यांसोबतही चांगली कनेक्ट राहाते.

आताही तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. सोनालीने नुकतेच एक फोटोशुट केले आहे. साडीत केलेले हे फोटोशुट सोशल मीडियावर चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

‘बकुला नामदेव घोटाळे ‘या चित्रपटातून सोनाली कुलकर्णी हिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर तीने अनेक सिनेमांत काम केले. यातील बरेच सिनेमे हीट देखील झाले. सोनालीला नटरंग या चित्रपटातून खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्धी मिळाली. यातील अप्सरा आली या गाण्याचा तर मोठा चाहता वर्ग आहे. याचमुळे सोनालीला पुढे अप्सरा ही ओळख मिळाली.

सोनाली ही मराठीतील टॉप अभिनेत्रीपैंकी एक असून ती सध्या ‘थ्री चिअर्स टू ‘ या चित्रपटांमध्ये ‘हेमंत ढोमे’ आणि ‘संतोष जुवेकर’ सोबत दिसणार आहे. तसेच गेल्या वर्षी सोनालीचा साखरपुडा झाला असून यावर्षी ती कुणाल बेनोडेकरसोबत  विवाह बंधनात अडकणार आहे.

हे देखील वाचा