Friday, April 11, 2025
Home अन्य ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’साठी नटली महाराष्ट्राची ‘अप्सरा’, ग्लॅमरस अंदाजात नेसली दहावारी साडी

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’साठी नटली महाराष्ट्राची ‘अप्सरा’, ग्लॅमरस अंदाजात नेसली दहावारी साडी

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या जोरदार चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. यावर्षी तेणे अनेक चित्रपटात काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तिचा बोलबाला चालू असतो. नुकतेच या वर्षी लग्न बंधनात अडकलेली सोनाली तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते प्रतीक्रिया देत असतात. अशातच तिचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनालीने अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाची ग्लॅमरस दहावारी साडी नेसली आहे. यावर तिने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे. या साडीवर तिने कोल्हापुरी चप्पल घालून डायमंड ज्वेलरी घातली आहे. नाकातील नथ देखील डायमंडची आहे. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहे. फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Sonalee Kulkarni share her beautiful photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “महाराष्ट्राचा फेवरेट कोण, सुवर्णदशक सोहळ्यासाठी खास दहावारी.” तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “महाराष्ट्राची माहीत नाही, पण माझी तर फेव्हरेट तूच आहेस.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. त्यामुळे तिचा हा लूक सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतेच तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच ती ‘पांडू’ या चित्रपटात देखील दिसली आहे. या चित्रपटातील तिची आणि भाऊ कदमची केमिस्ट्री सगळ्यांना आवडली आहे.

हे देखील वाचा