आज संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. स्त्रीच्या कर्तृत्वाचा आणि शक्तीचा सन्मान करण्याचा आजचा दिवस. विविध क्षेत्रात यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्या महिलांचा आज महिला दिनानिमित्त विशेष गौरव केला जातो. जगभरातील महिलांचे वेगवेगळ्या क्षेत्रात नेहमीच विशेष योगदान लाभले. आजच्या स्त्रियांच नाही तर आपल्या इतिहासातील देखील स्त्रियांनी त्यांच्या पराक्रमाने मोठा नावलौकिक मिळवला.
जिजाबाई, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर आनंदी जोशी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी आदी अनेक आपण यशस्वी आणि कर्तृत्वान स्त्रियांची उदाहरणं देऊ शकतो. याच यादीतले महत्वाचे अजून एक नाव म्हणजे महाराणी ताराबाई. लवकरच महाराणी ताराबाई यांच्या विशाल अशा कर्तृत्वावर एक मराठी सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहे. आजचे महिला दिनाचे औचित्य साधत सोनालीने एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
मागील अनेक दिवसांपासून सोनाली कुलकर्णीच्या ‘महाराणी ताराबाई’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याच पार्श्वभूमीवर सोनालीने ही पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी ‘रैन्हा डोस मराठे’ किंवा ‘मराठ्यांची राणी’ असेही संबोधले होते. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत. अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल. मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री. आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंनी मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला. मी हा #जागतिकमहिलादिन त्यांना आणि त्यांच्या सारख्या स्त्रियांना समर्पित करते ज्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात.
सोनालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्या पोस्टबद्दल सहमती दाखवली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला !!! लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊने राजा शिवछत्रपती घडविले, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला, स्त्री म्हणजे Archives, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराच घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा !!! जागतिक महिला दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!” मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील सिनेमासाठी चांगलेच आतुर दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीला पत्र लिहित चाहता म्हाणाला, ‘जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या….,’
धक्कादायक! अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण, ओळखणे झाले कठीण; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण










