मराठी सिनेमाची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी, ग्लॅमरस लूकमधील तिचे एकामागून एक फोटो शेअर करतच असते. ‘हिरकणी’ फेम अभिनेत्री आपल्या स्टाईलिश अंदाजाने चाहत्यांनी मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी सोनाली, सतत तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलद्वारे चाहत्यांसमोर सादर करत असते. अशातच अभिनेत्रीने तिचा हॅलोविन लूक चाहत्यांसमोर सादर केला आहे, ज्याला चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे.
सोनालीने नुकतेच काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली आहे. फोटोतील सोनालीच्या अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल! यामध्ये सोनालीने खूप सूंदर मेकअप केला आहे. या फोटोतील आकर्षण म्हणजे, तिने घातलेला मास्करेड. तिने अतिशय सुंदर मास्करेड घालून तिचा हा हॅलोविन लूक पूर्ण केला आहे. (sonalee kulkarni shared her helloween look on social media)
सोनालीच्या या कातिलाना लूकला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तिचे चाहते फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करून, तिच्याप्रती त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतायेत. या फोटोंना आतापर्यंत तब्बल ३८ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सोनालीच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
सोनाली कुलकर्णीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.
सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे म्हणले, तर कारकिर्दीच्या प्रारंभी तिने एक मॉडेल म्हणून काम केले. त्यांनतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामधून तिने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देण्यात आला. सोनाली ती मुळची पुण्याची आहे. ती ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीनृत्यासाठी साठी विशेष ओळखली जाते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास