Monday, July 1, 2024

कोरोना जाईना! ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला आठवतायत महामारीच्या पूर्वीचे दिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

मागील वर्षीच्या सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरस या भयंकर महामारीने संपूर्ण जगात आपली दहशत पसरवली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांना या व्हायरसचा फटका बसला आहे. सामान्य व्यक्तींपासून ते मोठ मोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण कोरोनामुळे चिंतेत आहेत. यादरम्यान लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कलाकारांना घरातच बसावे लागत आहे. असे असले तरीही ते सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि या व्हायरसबद्दल आपले मत मांडत असतात. सोबतच आपल्या चाहत्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करतात. अशातच आता ‘अप्सरा’ म्हणजेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यादरम्यान फोटो शेअर केले आहेत, जे सर्वांचेच लक्ष वेधत आहेत.

सोनालीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोत ती फुलांची नक्षी असलेल्या ड्रेेसमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘जाने कहा गए वो दिन,’ अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. यासोबतच तिने #prepandemic #era #takemeback #thosewerethedays यांसारख्या हॅशटॅगचा समावेश केला आहे. सोनाली कोरोना व्हायरसपूर्वीचे जुने दिवस आठवत आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे तिला घरीच बसावे लागत आहे. तिच्या या पोस्टवरून समजते की, या लॉकडाऊनमुळे कलाकार फारच कंटाळले आहेत.

सोनालीच्या या पोस्टवर प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक असलेल्या प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने कमेंट केली आहे. तिने म्हटले आहे की, ‘लवकर तसेच दिवस परत येणार.’ यासह तिने लव्ह इमोजीचाही समावेश केला आहे.

सोनाली फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असते. कधी ती आपले पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर करते, तर कधी ग्लॅमरस अंदाजातील. तिने गुढीपाडव्यानिमित्त साडीतील फोटो शेअर केले होते.

सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर सुरुवातीला तिने एक मॉडेल म्हणून काम केले. त्यांनतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देखील देण्यात आला. सोनाली ही मूळची पुण्याची आहे. ती ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ या लावणीनृत्यासाठी विशेष ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…

-स्त्री- पुरुषातील भेद संपवत मराठमोळ्या अभिनेत्याने धोतर म्हणून नेसली साडी, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

-बाबो! अभिनेत्री प्रियांका चोप्राने बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात घातले होते महागडे पिंक जॅकेट, किंमत आली समोर

-एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या विरोधात उभा राहिला होता संपुर्ण समाज, तरीही प्रियकराशीच केले लग्न

हे देखील वाचा