Saturday, July 6, 2024

‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’, सोनालीने शेअर केलेले ‘ते’ खास फोटो पाहिलेत का?

मराठमोळी अभिनेत्री आणि ‘अप्सरा’ या नावाने म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर व्यस्त असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सर्वात पुढे आहे. ती नेहमीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सोनालीचा आजच्याच दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी २०२० रोजी लंडन येथील भारतीय मूळ असलेल्या कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा झाला होता. आज ती आपल्या साखरपुड्याची पहिली ऍनिव्हर्सरी साजरी करत आहे. यानिमित्ताने तिने आपल्या साखरपुड्याचा एक फोटो शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनालीने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तिचा अर्धा चेहरा दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत तिचा पूर्ण चेहरा दिसत आहे. सोनालीने फोटो शेअर करत त्याला भन्नाट असे कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, “साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे.”

सोनालीने कुणालसोबतच्या आपल्या साखरपुड्याची घोषणा तिच्या वाढदिवशी १८ मे रोजी केली होती. त्यावेळी तिने फोटो शेअर करत आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.

 

सोनालीच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून सोनालीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले. तिने काम केलेले अनेक चित्रपट हिट झाले. त्यातीलच एक म्हणजे ‘नटरंग’ होय. या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली.

सध्या सोनाली हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी गोडबोले या कलाकारांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

साडीत खुलून आलं अप्सरेच सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे साडीतील पाच खास फोटो

गुलाबी रंगात ‘अप्सरेचं’ सौंदर्य आणखीनच खुललं, सोनालीच्या अदा अन् सौंदर्य पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

अभिज्ञा भावेने बांधली साताजन्माची गाठ! मेहुलसोबत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरूवात; पाहा लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ

हे देखील वाचा