Tuesday, July 9, 2024

सोनाली कुलकर्णीच्या झक्कास फोटोने वेधले सर्वांचे लक्ष; चाहत्याने केली अशी कमेंट की, अभिनेत्रीही म्हणाली…

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. आपल्या सौंदर्याने आणि नजरेच्या एका इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. तसेच तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाइल सगळ्यांना खूप आवडते. तिचे चाहते देखील तिच्या नवनवीन ड्रेसिंग स्टाइलला प्रोत्साहन देत असतात. अशातच सोनालीचा एक आगळा-वेगळा लूक समोर आला आहे.

सोनालीने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तिने मल्टी कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच सगळे केस मागे बांधले आहेत. तसेच पायात काळ्या रंगाची स्टोनची चप्पल घातली आहे. या फोटोमध्ये ती अप्रतिम दिसत आहे. या लूकमधील तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “छान किती दिसते फुलपाखरू.” तसेच आणखी एका व्यक्तीची कमेंट चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. तिच्या या फोटोवर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, “काय धारखेडकर बाई” यावर सोनालीने “कोण” अशी कमेंट केली आहे.” सहसा सोनाली कोणाच्याही कमेंटला उत्तर देत नाही पण तिने या व्यक्तीच्या कमेंटला रिप्लाय दिला आहे. त्यामुळे ती व्यक्ती नक्की कोण आहे, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. (sonalee kulkarni’s new look viral on social media)

https://www.facebook.com/photo.php?fbid=404674621015871&set=pcb.404676247682375&type=3&theater

सोनाली आजकाल सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असते. मागील काही दिवसात ती तिचा पती कुणालसोबत मालदीवला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ ‘हंपी’, ‘धुराळा’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, क्षणभर विश्रांती’, ‘सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा