Sunday, February 1, 2026
Home मराठी ‘अप्सरे’चा स्टनिंग लूक आला समोर, क्रॉप टॉपमधील सोनाली कुलकर्णीचे फोटो व्हायरल

‘अप्सरे’चा स्टनिंग लूक आला समोर, क्रॉप टॉपमधील सोनाली कुलकर्णीचे फोटो व्हायरल

आपल्या सहजसुंदर अभिनयाने समस्त महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटात अप्रतिम भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. केवळ अभिनेत्रीच नाही, तर ती एक डान्सर देखील आहे. अनेक चित्रपटात किंवा एखाद्या अवॉर्ड शोमध्ये तिचा अफलातून डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. सोनाली सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असते. तिचे फोटो ती दरदिवशी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच तिचा एक स्टनिंग लूक समोर आला आहे.

सोनालीने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने जांभळ्या रंगाचा एक क्रॉप टॉप घातलेला आहे. तसेच तिने निळ्या रंगाची जीन्स घातलेली आहे. तिने केसांची वेणी घातलेली दिसत आहे आणि हातात केवळ एक ब्रेसलेट घातले आहे. या फोटोमध्ये ती सोफ्यावर बसून आणि झोपून पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूप स्टनिंग दिसत आहे. तिचे चाहते देखील या फोटोवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत ८४ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

सोनाली मागील काही दिवसांपूर्वी तिचा पती कुणालसोबत मालदीवला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचा हा फोटो देखील खूप व्हायरल होत आहे. (sonalee kulkarni’s stunning look viral on social media)

सोनालीने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ या रियॅलिटी डान्स शोचे परीक्षण देखील केले आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘हंपी’, ‘झपाटलेला २’, ‘शटर’, अजिंठा’, ‘ती आणि ती’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र ….

-देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल

हे देखील वाचा