Monday, July 8, 2024

सोनाली खरेचा मुलीसोबत भन्नाट व्हिडिओ समोर, पाहून ओळखणेही होईल कठीण मुलगी कोण आणि आई कोण?

चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार फिटनेसला खूप महत्व देतात. फिटनेस हा त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग असतो. अशीच मराठी चित्रपटसृष्टीतील फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने एका खास व्यक्तीसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. सोनालीने तिच्या मुलीसोबत व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती तिची मुलगी सनासोबत दिसत आहे. सोनालीकडे बघून कोणालाही विश्वास बसणार नाही की, सोनाली एवढ्या मोठ्या मुलीची आई आहे. त्या दोघींनी ही डोळ्यांवर चष्मा लावला आहे. त्या दोघीही एका गाण्याच्या बीटवर डान्स करत आहेत. (Sonali khare share a dance video with her daughter)

हा व्हिडिओ शेअर करून तिने “माईंड इट,” असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर तिची मैत्रीण अमृता खानविलकर हिने मला देखील हे करायचं आहे, अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

सोनलीने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम करून नाव मिळवले आहे. तिने ‘रोशनविला’, ‘हृदयांतर’, ‘चेकमेट’, ‘सावरखेड एक गाव’, ‘तेरे लिये’, ‘जरा हटके’, ‘वेल डन बेबी’, ‘स्माईल प्लीज’, ‘नवरा माझा भवरा’, ‘वंशवेल’, ‘रेशीमगाठ’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

चाहत्याच्या ‘या’ कृत्यामुळे रुबीना दिलैक भडकली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लगावली फटकार

ब्रेकिंग! अभिनेत्री नोरा फतेही कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांमध्ये काळजीचे वातारण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला… 

 

 

हे देखील वाचा