हिंदी चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूरचा पती उद्योजक आनंद आहुजा एका मोठ्या कंपनीसोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी वादात सापडला आहे. या बातमीने सध्या हिंदी चित्रपट जगतात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ. अभिनेत्री सोनम कपूरचा(Sonam kapoor) पती आणि उद्योजक आनंद आहुजावर एका कंपनीने इनकम टॅक्स आणि कस्टम ड्युटीमध्ये सूट मिळण्यासाठी कागदपत्रांमध्ये अफरातफर केली आहे असे आरोप केले आहेत या प्रकरणी आता आनंद आहुजा यांचे काही दिवसापूर्वीचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी या कंपनीबद्दल राग व्यक्त केला होता.
काही दिवसांपूर्वी आनंद आहुजा यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी “कोणी माययूएस कंपनीच्या संपर्कात आहे का? या कंपनीच्या चुकीच्या कामामुळे त्यांच्या शिपमेंटला उशीर होत आहे, ज्यामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कंपनी चुकीच्या पद्धतीने सामान जप्त करत आहे आणि कागदपत्रांच्या कारवाईला सुद्धा नकार देत आहे” असा संदेश लिहिला होता. आनंद आहुजाच्या या ट्विटवर संबधित कंपनीने आक्षेप घेत ईमेल करून या बद्दल बोलायला हवे होते थेट सोशल मीडियावर टाकणे चुकीचे आहे असा सल्ला दिला होता. मात्र ही सगळी प्रोसेस मागच्या 7 दिवसांपासून करून झाली आहे.” असे उत्तर आनंद आहुजा यांनी दिले होते.
आनंद आहुजा यांच्या या आरोपांवर त्या कंपनीने स्पष्टीकरण देताना “आमच्या सेवांमध्ये नाही तर तुमच्या कागद पत्रात त्रुटी आहेत. आनंद यांनी सामना सोबत दिलेली रक्कम 90% कमी असल्याचे सांगितले आहे. आनंद आहुजा यांनी टॅक्स भरावा लागु नये म्हणुन हा घोळ केला असल्याचेही या कंपनीने म्हंटले आहे”. आता या सगळया प्रकरणावर आनंद आहुजा काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
- हेही वाचा- ‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या क्रूर आणि दमदार भूमिकेने वेधले सर्वांचे लक्ष
- राज कपूर यांनी स्वभावाने लाजाळू असणाऱ्या दिलीप कुमार यांची ‘अशी’ घेतली फिरकी, वाचा भन्नाट किस्सा
- ‘श्रीवल्ली’ गाण्यावरील आतापर्यंतचा बेस्ट व्हिडिओ, अनुपम खेर यांच्या आईने केला गाण्यावर भन्नाट डान्स
- हे ही पाहा :
- https://youtu.be/Tx87nxgHWcY