Saturday, July 6, 2024

भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

बॉलिवूड अभिनेत्री अधिक सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात. परंतु काहीवेळा या कपड्यांमुळे त्या ऊप्स मूमेंटच्या बळी ठरतात. अशावेळी अभिनेत्रींचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्याशिवाय कसा काय राहू शकतो? असे व्हिडिओ आणि फोटो बघता बघताच व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर देखील अनेकवेळा ऊप्स मूमेंटची शिकार झाली आहे. सोनमला तिच्या फॅशन सेन्समुळे स्टायलिश क्वीन म्हटलं जातं, पण स्टाईलच्या बाबतीत सोनमही ऊप्स मूमेंटची शिकार झाली आहे.

सोनम कपूरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनम रोज तिच्या आउटफिट्सवर वेगवेगळे प्रयोग करत असते, पण यावेळी तिची हीच स्टाईल तिला महागात पडली. अभिनेत्रीने एका कार्यक्रमासाठी काळी आणि पांढरी प्रिंटेड साडी परिधान केली, जी तिने शर्टसह पेअर केली होती. संपूर्ण कार्यक्रमात अभिनेत्री तिच्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नव्हती. जेव्हा ती भाषण देण्यासाठी उभी राहते, तेव्हा साडीत अडकून पडू लागते. तिथे उपस्थित लोक तिला पडण्यापासून वाचवतात. (sonam kapoor oops moment shirt buttons opens in mid event actress falls stucked in saree)

दरम्यान, सोनम कपूरच्या शर्टची बटणेही उघडतात आणि ती ऊप्स मूमेंटची शिकार बनते. अभिनेत्री हा क्षण कशीबशी सावरते आणि पुढे जाते. व्हिडिओमध्ये ती स्टेजवर उभी राहून तिच्या शर्टची बटणे बंद करताना दिसत आहे. तसेच, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अखेरच्या वेळेस तिचा ‘द झोया फॅक्टर’ हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीझ झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकली नाही. या चित्रपटात दलकीर सलमान सोनमसोबत मुख्य भूमिकेत होता. शिवाय त्यात अनिल कपूरचा कॅमिओही होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरचा ‘हा’ विचित्र ड्रेस पाहून नेटकरी चिडले, ‘या’ अभिनेत्यासोबत तुलना करत म्हटले ‘गरीब’

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी रणबीरने सोनमला दिला होता धोका? आता आलियासोबत…

-नक्कल करावी तर अशी! जॉनी लिव्हरच्या पोरीनं केली सोनम कपूरची जबरदस्त मिमिक्री; तुम्हालाही फुटेल हसू

हे देखील वाचा