Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड Anil Kapoor Fitness: अनिल कपूर अजूनही का दिसतात तरुण ? सोनम कपूरने केला खुलासा

Anil Kapoor Fitness: अनिल कपूर अजूनही का दिसतात तरुण ? सोनम कपूरने केला खुलासा

अभिनेते अनिल कपूर(Anil Kapoor)अजूनही पूर्वीसारखे हॅण्डसम आणि चार्मिंग दिसतात. त्यांचे वय म्हणजे नुसता आकडा. वयाची ६७ ओलांडूनही ते एका तिशीतल्या तरूणासारखेच दिसतात. तरुणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस. या वयातही अनिल कपूर स्वतःचा फिटनेस कसा सांभाळतात, त्यांचा आहार काय? असं अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेलं असतात. दरम्यान, या सर्व प्रश्नांची उत्तर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor ) दिली आहेत.

सोनम कपूरने (Sonam Kapoor ) डॉक्टर शिव के सरीन यांच्या ‘ओन युअर बॉडी : डॉक्टर्स लाईफ सेविंग टिप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिनं अनिल कपूर (Anil Kapoor)यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. तसेच तिनं बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्यावरही भाष्य केलं.

माझे वडील मद्यपान आणि धुम्रपान करत नाही. त्यांना कुठलेही व्यसन नाही. त्यामुळेच ते इतके फिट आहेत. तर बोनी कपूर यांना विविध पदार्थ खायला खूप आवडतात आणि कधीतरी मद्यपानदेखील करतात. संजय कपूर हेदेखील तसेच आहेत. पण ते तिघेही तब्येत जपणारे आणि या वयातही सुंदर दिसणारे पुरुष आहेत.

यावेळी सोनमने(Sonam Kapoor ) तिचे आजोबा आणि चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर यांचे उदाहरण दिले. २०११ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांचे पांढरे केस सोडले तर ते कसे दिसायचे हे सांगितले.

तसेच वडीलांच्या (Anil Kapoor) फिटनेसचं श्रेय आईला देत ती पुढे म्हणाली, अगदी सुरुवातीपासून ती आरोग्याची खूप काळजी घेते. आता तर त्यांचं वय ६० पेक्षा जास्त आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, माझ्या आईने पहिल्यांदा मुंबईत वैयक्तिक जिमचं प्रशिक्षण घेतलं. हे खूप वर्षांपूर्वी घडलं होतं, त्यामुळे माझी आई सुरुवातीपासूनच खूप निरोगी आहे. वडिलांनाही आई खूप प्रोत्साहन देते. एका भारतीय पत्नीप्रमाणे माझी आई वडिलांच्या खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवत असते.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 2018 मध्ये ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली होती, जो फ्लॉप ठरला होता. यानंतर ती ‘ब्लाइंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर अनिल कपूर हे अलीकडे ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’ सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत.

हे देखील वाचा