बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासह हटके लूकमुळे आणि जबरदस्त फॅशन सेन्समुळे सोनम कपूर नेहमीच चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. वेगवेगळ्या आकर्षक डिझाइनच्या ड्रेसमधून ती नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ करते. सोनमला फॅशनेस्टा देखील म्हटले जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी सोनम नेहमीच तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या असेच हटक्या स्टाईलमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
सोनमने नुकताच एक नवीन लूक केला आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर आणि लक्षवेधक दिसत आहे. विशेष म्हणजे तिने घातलेल्या ड्रेसवर स्त्रीच्या शरीराचे चित्र रेखाटलेले आहे. यामधून स्त्री आणि पुरुष लैंगिक समानतेचा संदेश दिला जात असल्याचे दिसत आहे. तिने या ड्रेससोबत अतिशय साधा मेकअप केला असून त्यावर लाल भडक रंगाची लिपस्टिक लावलेली आहे. तसेच केसांचा साधा बन बांधत, या ड्रेसवर मोठे कानातले देखील घातलेले आहेत. त्यामुळे या लूकची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
सोनमने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे मित्र आएशा भारती पस्रिचा आणि सरन पस्रिचा गेल्या पाच वर्षांपासून ‘मैसोन वेस्टेल्ले’ नावाच्या फॅशन प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यांनी याचा आनंद साजरा करण्यासाठी मला जेवणास आमंत्रित केले.”
सोनमच्या या हटके लूकची अनेकांनी वाहवा केली, तर काहींनी तिच्यावर टीका केली. एकाने तिची तुलना चक्क रणवीर सिंग बरोबर देखील केली. सोनम नेहमीच अशा प्रकारचे वेगवेगळे लूक करते. त्यामुळे तिला ट्रेंड मेकर देखील बोलले जाते. सध्या ती पती आनंद आहुजाबरोबर लंडनला राहत आहे.
तिच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती ‘ब्लाइंड’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच साल २००७ मध्ये तिने ‘सावरीया’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साल २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रांझणा’ चित्रपटामधील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला
-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…