Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड आनंदाची बातमी! सोनू निगमला मिळाला दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’, मिळणार ‘हे’ फायदे

आनंदाची बातमी! सोनू निगमला मिळाला दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’, मिळणार ‘हे’ फायदे

 

परदेशात जाण्यासाठी आपल्याकडे पासपोर्टसोबतच व्हिसा असणे देखील खूप गरजेचे आहे. व्हिसा म्हणजे काय तर आपण ज्या देशात जात आहोत, त्या देशाची आपल्याला त्यांच्या देशात जाण्यासाठी मिळालेली परवानगी आहे. बॉलिवूडच्या कलाकारांना त्यांच्या कामाच्या निमित्ताने नेहमीच परदेशवाऱ्या कराव्या लागतात. कधीकधी व्हिसा मिळण्यासाठी अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र यावर संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएईने ‘गोल्डन व्हिसा’ ही संकल्पना अंमलात आणली आहे.

आतापर्यंत बॉलिवूडच्या आणि साऊथ इंडस्ट्रीच्या बऱ्याच कलाकारांना हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. आता या यादीमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील यशस्वी गायक असणाऱ्या सोनू निगमच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. इंस्टाग्रामवरील ‘विरल भियानी’ या पेजवरून सोनूला हा व्हिसा मिळाल्याचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सोनू आधी शाहरुख खान, संजय दत्त, सुनील शेट्टी, ममूटी, मोहनलाल, सानिया मिर्जा, नेहा कक्कर, रोहनप्रीत, बोनी कपूर आदी सेलिब्रिटींना हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

सोनू निगम हा बॉलिवूडचा सर्वात यशस्वी, लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक असून त्याने आतापर्यंत हिंदीसोबतच कन्नड़, उडिया, तामिळ, असमिया, पंजाबी, बंगाली, मराठी, नेपाळी, मल्याळम, गुजराती, तेलगू आदी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्याने आतापर्यंत जवळपास ४००० पेक्षा जास्त गाणी गायली असून, त्याला ‘मॉडर्न रफी’ असे देखील संबोधले जाते.

हा गोल्डन व्हिसा मिळालेल्या व्यक्तीला संयुक्‍त अरब अमीरात म्हणजेच दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी असते. आधी हा व्हिसा फक्त मोठमोठे उद्योगपती, गुंतवणूकदार यांनाच दिला जात होता. मात्र मागच्या वर्षी यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे आता हा व्हिसा डॉक्टर्स, अभिनेता, वैज्ञानिक यांच्यासमवेत अजून अनेक लोकांना मिळू शकणार आहे. नियमांमध्ये झालेल्या या बदलांमुळेच अनेक भारतीय सेलिब्रिटींना हा व्हिसा मिळाला आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा