Wednesday, June 26, 2024

सलाम तुझ्या कार्याला! फोर्ब्सने सोनू सूदला केले ‘बेस्ट लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित, अभिनेत्यानेही मानले आभार

आपल्या अभिनयासोबत‌ इतर कामांमुळे सर्वत्र प्रसिद्ध असणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद. त्याने मागच्या वर्षी कोरोना महामारीमध्ये अनेक प्रवाशांना मदत केली होती. सोनू एक मदतगार बनून सगळ्यांसमोर आला. त्यामुळे त्याच्या कामाचे देखील खूप कौतुक केले गेले. त्याच्या या कामामुळेच त्याला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यानंतर त्याला आता फोर्ब्सकडून ‘बेस्ट लीडरशिप’ पुरस्कार दिला आहे.

सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याला ‘कोविड- 19 हिरो’ असे संबोधले आहे. या निमित्ताने त्याने हात जोडून सगळ्यांचे आभार मानले आहेत.

फोर्ब्स इंडियाने त्यांच्या फेसबुक पेजनुसार सोनूने प्रवाशी रोजगारावर भाष्य केले. तसेच 5 वर्षात 10 कोटी माणसापर्यंत पोहोचण्याचा दावा केला आहे.

याआधी देशातील विमान कंपनी स्पाईस जेटने कोरोना काळात सोनू सूदचा मदत करतानाचा एक फोटो त्यांच्या विमानावर लावला होता. यासह त्याला खास अंदाजात सलाम केले होते. स्टाईस जेटने सोनू सूदला सन्मानित करण्यासाठी त्यांच्या बोईंग 737 विमानावर सोनू सूदचा फोटो लावला होता. या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले होते. सोनूनेही यावर प्रतिक्रिया दिली होती.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तो लवकरच ‘आचार्य’ या तेलुगु चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या हिंदी चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने ‘जोधा अकबर’, ‘शूट आऊट ॲट वडाला’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘सिंबा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-भोजपुरी स्टार राकेश मिश्राने केला अक्षरा सिंगसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर, सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा