कोरोना काळाविरुद्धच्या लढाईत पुढे आलेला सोनू सूद, गेल्या एका वर्षापासून गरजूंना, कोरोना रुग्णांना सतत मदत करत आहे. सन २०२० मध्ये सुरू झालेल्या, या भयानक साथीमुळे लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदने अनेक स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले होते. त्या काळापासून आजपर्यंत त्याची मदत करण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडियावर लोक सोनू सूदकडे मदत मागतात आणि अभिनेता तातडीने त्यांना मदत करतो. मग ते कोव्हिडशी संबंधित असेल, किंवा इतर काही समस्या. एकदा सोनू सूद हो म्हणाला की, मदत लोकांपर्यंत पोहोचते. पण आश्चर्य म्हणजे लोक आता सोनू सूदच्या निःस्वार्थ मदतीवर प्रश्न विचारू लागले आहेत. असेच काहीसे अलीकडे घडले, पण सोनूने त्यास चोख प्रत्युत्तर दिले आहे.
खरं तर, सोन सूदने यापूर्वी ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील डीएम, यांच्याकडे मदत मागणार्याला मदत केली होती. त्यानंतर त्यानी ट्वीट केले होते की, रुग्णाला मदत झाली आहे. परंतु सोनूचे ट्वीट रिट्विट करत गंजम डीएम यांनी सोनूची मदत चुकीची असल्याचे म्हटले. त्यानंतर सोनू सूद याने रूग्णाच्या कुटुंबाशी बोलणे झालेला, व्हॉट्सऍप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला, आणि डीएम यांना चोख उत्तर दिले आहे.
सोनू सूद याने ट्वीट करून लिहिले की, ‘सर, आम्ही कधीही असा दावा केला नाही की, तुम्हाला मदत मागितली गेली आहे, आम्हाला स्वतः गरजूंनी संपर्क साधला आहे, आणि आम्ही त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे. मी तुमच्यासाठी काही चॅट शेअरदेखील शेअर करत आहे. आपले कार्यालय खूप चांगले काम करत आहे, आणि आम्ही त्यास मदत केली आहे हे तुम्ही पुन्हा तपासू शकता. संदेशात मी त्याचा नंबर तुम्हाला पाठवला आहे. जय हिंद.’
Sir, We never claimed that we approached you, it's the needy who approached us & we arranged the bed for him, attatched are the chats for your reference.Ur office is doing a great job & u can double check that we had helped him too.Have DM you his contact details. Jai hind , ???????? https://t.co/9atQhI3r4b pic.twitter.com/YUam9AsjNQ
— sonu sood (@SonuSood) May 17, 2021
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील डीएम यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये सोनू सूदच्या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आला होता. यासह त्यांनी लिहिले, ‘सोनू सूद फाउंडेशन, किंवा त्यांच्या टीमशी आमचा काही संपर्क झाला नाही. रुग्ण घरात विलगीकरणात आहे, आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. बेडचा काही प्रश्नच नाही. बहरामपुर महानगरपालिका त्यावर नजर ठेवून आहे. सीएमओ ओडिसा.’
We don’t received any communication from @SoodFoundation or @SonuSood . Requested patient is in Home isolation and stable. No bed issues @BrahmapurCorp is monitoring it. ???????? @CMO_Odisha pic.twitter.com/oDeSrzpE3t
— Collector & District Magistrate, Ganjam (@Ganjam_Admin) May 17, 2021
पूर्वीसुद्धा सोशल मीडियावर काही लोकांनी सोनू सूदला इतकी मदत केल्याबद्दल ट्रोल केले होते. लोक म्हणायचे की, सोनू विनाकारण कशाला मदत करत आहे. यावर त्याने चोख प्रत्युत्तर दिले होते, आणि म्हणाला होता की, ‘एखाद्याने त्याला फसवणूक म्हणणे तसेच आहे, जसे अनेक भ्रष्ट अधिकारी चांगल्या काम करणाऱ्या या प्रामाणिक अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असतात.’ त्याला असे वाटते की, अशा लोकांकडे लक्ष देऊन, आपला वेळ वाया घालवायचा नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी
-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन
-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल










