Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ‘हिरोईनसोबत लग्न लावून दे’ चाहत्याने केली सोनु सूदकडे मागणी, अभिनेत्याचे उत्तर पाहून पोट धरुन हसाल

‘हिरोईनसोबत लग्न लावून दे’ चाहत्याने केली सोनु सूदकडे मागणी, अभिनेत्याचे उत्तर पाहून पोट धरुन हसाल

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सोनू सूदचे (Sonu Sood) नाव दररोज चर्चेत असते. कोरोनाच्या काळात लोकांसाठी मसिहा म्हणून उदयास आलेला सोनू सूद अनेकदा लोकांना मदत करताना दिसतो. सोशल मीडियावर सोनूने लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच हात पुढे केला आहे. दरम्यान, एका चाहत्याने सोनू सूदला बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची विनंती केली होती, आता सोनू सूदने यावर मजेशीर उत्तर दिले आहे.

सोनु सूद हा हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. चित्रपटांमध्ये जरी सोनु सूदच्या खलनायकी भूमिका गाजल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो नायक म्हणूनच ओळखला जातो. कोविड 19 च्या काळात सोनू सूदने सोशल मीडियाच्या आधारे असहाय लोकांना खूप मदत केली होती. तेव्हापासून आजपर्यंत लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते थेट सोनू सूद यांच्यापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचतात. परंतु बऱ्यादचा चाहते सोनुकडे अशा काही मागण्या करताना दिसतात ते पाहून सोनूचीही बोलती बंद होते. शुभम डॉन नावाच्या ट्विटर यूजरने सोनू सूदसोबत लग्नासाठी अर्ज केला. या यूजरने लिहिले आहे की, “भाऊ कृपया माझे लग्न एखाद्या नायिकेशी करा,” यावर सोनू सूदने आपली मजेशीर प्रतिक्रिया देत “हो सर्व नायिका तुझ्याशी लग्न करण्यासाठी माझ्या मागे लागल्या आहेत,” असे उत्तर दिले आहे.

या मजेशीर वाक्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्याच्या आधारे एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, “सोनू भाई, तुम्ही त्या व्यक्तीचे भावनिक नुकसान केले आहे.” आणखी एका यूजरने “अरे देवा, आता सर हे कामही सुरू करतील, जे लोकांच्या लग्नासाठी हिरोईनचे स्थळ आणतील,” अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे या व्हायरल पोस्टनंतर सोनूकडे चाहत्यांच्या विविध मागण्या येताना दिसत आहेत.

हेही वाचा –

नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाचे अनसीन फोटो व्हायरल; रजनीकांत, शाहरुखने वेधले लक्ष

बाबो! रणबीर कपूर म्हणतोय ‘हेच’ मी माझ्या मुलाला शिकवणार

नाकातील नथ अन् लाल काठाची पांढरी साडी खुलवतेय अप्सरेचं सौंदर्य; फोटो एकदा पाहाच

हे देखील वाचा