कलाकार सध्याच्या काळात चित्रपटांसोबतच इतर वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येताना दिसतात. काही कलाकार टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये परीक्षक, सूत्रसंचालन करताना दिसतात तर काही कलाकार ओटीटी माध्यमावर काम करताना दिसतात. या यादीमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठमोठे कलाकार सामील असून, आता या यादीत अजून एका नावाची भर पडणार आहे. लवकरच अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देखील एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडच्या हँडसम आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सोनू सूद ओळखला जातो. सध्या तो अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. मात्र लवकरच सोनू टेलिव्हिजन क्षेत्रात त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. तो लवकरच एमटीव्ही वरील अतिशय चर्चित आणि लोकप्रिय अशा ‘रोडीज’ (Roadies) या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या शोमध्ये सध्या नेहा धुपिया परीक्षक म्हणून दिसत असून, तिच्यासोबत सोनू देखील आता ही जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. नुकताच या शोच्या नवीन पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये सोनू सूद एका मशीनला हाताने फिरवताना दिसत आहे. याच वेळेस चॅनेलचे काही लोकं त्याच्याकडे येतात आणि त्याला शोसाठी परीक्षण करण्याची विनंती करतात. यादरम्यान चॅनेलचे लोकं सोनूसोबत शेतातून जॉगिंग करताना देखील दिसतात. एका छोट्या गावातून सोनू जॉगिंग करत गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन पोहचतो. त्याच्या मागे चॅनेलचे लोकं देखील जातात. त्यांना पाहून सोनू म्हणतो की, “पाजी मला वाटते की तुम्हाला एमटीव्हीवाल्यानी बकरा बनवले आहे. कारण मी आधीच ‘रोडीज’ शोसाठी होकार दिला आहे.”
या शोबद्दल अधिक बोलायचे झाले तर या पर्वाचे शुटिंग अधिक चांगल्या ठिकाणी वेगवेगळ्या अवघड टास्कसह नवीन होस्टसोबत केले जाणार आहे. एवढेच नाही तर ‘रोडीज- जर्नी इन साऊथ आफ्रिका’ सोबत स्पर्धकांना टास्कचा सामना करावा लागणार आहे. सोनू सूदने या शोबद्दल सांगितले की, “या शोचे हे नवीन पर्व अधिक अवघड असणार आहे.” या दरम्यान सोनू स्पर्धकांना मदत करताना दिसेल. ‘रोडीज’ हा एमटीव्हीवरील सर्वात जास्त लोकप्रिय आणि चर्चित शो आहे. मागील १८ वर्षांपासून हा शो चालू आहे. अभिनेता रणविजय सिंग हा शो होस्ट करायचा.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :