बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार म्हणजे सोनू सूद. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका निभावणार हा अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांचे जीव वाचवून त्यांच्यासाठी ‘देवदूत’ बनला आहे. मागील एका वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेकांचे जीव जात आहेत. यात सोनू सूद त्याला जमेल तशी सर्वांना मदत करत आहे. त्याने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी सूद फाउंडेशन चालू केले आहे. तसेच त्याच्या टीमने समाज सेवेसाठी एक टेलिग्राम ऍप लॉन्च केले आहे. या कोरोना काळात जेव्हा वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडत आहे तेव्हा सोनू सूदने स्वतः पुढाकार घेऊन अनेक नागरिकांना मदत केली आहे.
मागच्या वर्षी पासून सोनू सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो जास्तीक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तो सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज आणि कमेंटला सातत्याने रिप्लाय देत असतो. त्यामुळे लोकांचे सर्व समस्या त्याला समजतात आणि तो त्यावर तोडगा काढण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आता देखील त्याने एका ट्विटला रिप्लाय दिला आहे, तो खूप मजेशीर आहे. तो खूप मजेशीर आहे. खरंतर हा एका न्यूजचा व्हिडिओ आहे. तेलंगणामधील करीमनगर मधील एका मटण शॉपचे नाव सोनू सूदच्या नावावरून ठेवले आहे.
सोनू सूद हे पाहून चकित झाला आहे. त्यानेही बघता क्षणीच रीट्विट करून लिहिले की, “मी एक शुद्ध शाकाहारी व्यक्ती आहे. मटणाचे दुकान माझ्या नावावर?? मी काही शाकाहारी खोलण्यासाठी मदत करू शकतो का?” सोनू सूदने रिप्लाय दिलेले हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सगळेजण यावर त्यांची प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
I am a vegetarian..
N mutton shop on my name?????
Can I help him open something vegetarian ???? https://t.co/jYO40xAgRd— sonu sood (@SonuSood) May 30, 2021
यापूर्वी अनेकांनी आपापल्या दुकानांना सोनू सूदचे नाव दिले होते. यामध्ये मोबाईल शॉपच्या दुकानाचाही समावेश आहे.
सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तो लवकरच ‘आचार्य’ या तेलुगु चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या हिंदी चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने ‘जोधा अकबर’, ‘शूट आऊट ऍट वडाला’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘सिंबा’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…