Monday, July 1, 2024

अल्ताफ राजाचे ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाणे नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू अन् निधीच्या जोडीनं वेधलं लक्ष

मागील काही काळापासून अनेक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. टीव्ही, चित्रपट क्षेत्रातील अनेक लहान- मोठे कलाकार या व्हिडिओंमध्ये आपल्याला दिसतात. मागच्या काही काळात जरा मागे पडलेले म्युझिक व्हिडिओ पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडायला लागल्याचे दिसत आहे. कलाकारांच्या लोकप्रियतेत भर घालणारे हे म्युझिक व्हिडिओ गायक, कलाकार, संगीत दिग्दर्शक यांना नवीन ओळख मिळवून देण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत आहे.

याच म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता सोनू सूदचे देखील नाव सामील झाले आहे. नुकताच सोनू सूद आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांचा ‘साथ क्या निभाओगे’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. या दोघांच्या रोमँटिक केमेस्ट्रीने परिपूर्ण असलेले हे गाणे अल्ताफ राजा आणि टोनी कक्कर यांनी गायले आहे. ९० च्या दशकात लोकप्रियतेचे शिखर गाठणारे हे गाणे आज पुन्हा नवीन रूपात आणि नवीन ढंगात प्रेक्षकांच्या समोर आले आहे. आजच्या काळानुरूप या गाण्यात योग्य ते बदल केले असून, तरुणाईला आवडणारे संगीत या गाण्याला दिले आहे. (sonu sood saath kya nibhaoge video release)

‘साथ क्या निभाओगे’ हे गाणे काही तासांपूर्वीच प्रदर्शित झाले असून अवघ्या काही तासातच गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे एका दिवसातच या गाण्याला १९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच अनेक लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या जुन्या गाण्याला जरी नवीन रूपात सादर केले असले, तरीही गाणे बघताना जुन्या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सोनू सूदला बऱ्याच दिवसांनी या हटके आणि रोमॅंटिक अंदाजमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

या गाण्याला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका फराह खानने दिग्दर्शित आणि कोरिओग्राफ केले आहे, तर अंशुक गर्ग यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणे एक वराह गीत असून, यात प्रेमात अनेक अनेक चढ-उतार दाखवण्यात आले आहेत.

‘साथ क्या निभाओगे’ गाण्याबद्दल सांगताना सोनू सूद म्हणाला, “मला हे गाणे शूट करताना खूप मजा आली. फराहसोबत मी ‘हैप्पी न्यू इयर’ चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाच्या माझ्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. शिवाय ९० च्या दशकात आलेले हे गाणे जेव्हा प्रदर्शित झाले, तेव्हाची या गाण्याबद्दल असलेली लोकांची क्रेझी मला आठवत होती. मुख्य म्हणजे ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणे आम्ही पंजाबमध्ये चित्रित केल्याने मला तर अगदी घरी असल्याचेच जाणवत होते.’

‘साथ क्या निभाओगे’ या गाण्यात सोनूने एका शेतकऱ्यासोबतच पोलीस ऑफसरची भूमिका साकारली असून, एका रेड दरम्यान त्याला बारमध्ये नाचणारी निधी भेटते. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे गाणे बघावे लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

-‘शरारा शरारा’ गाण्यावर डान्स करत शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’वर एन्ट्री

हे देखील वाचा