Friday, May 9, 2025
Home बॉलीवूड माणसातील देव म्हणतात तो हाच! विमानतळावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सोनू सूदने दिले मदत करण्याचे वचन

माणसातील देव म्हणतात तो हाच! विमानतळावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सोनू सूदने दिले मदत करण्याचे वचन

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा एका उत्तम अभिनेता तर आहेच, पण सोबत एक चांगला व्यक्ती देखील आहे. याचा प्रत्यय गेल्या एक वर्षापासून आला आहे. कोरोनाच्या पहिला लाटेपासून ते आतापर्यंत तो गरजूंना मदत करत आहे. पहिल्या लाटेत त्याने मजूर प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत केली होती. लॉकडाऊन झाल्याने मजुरांची कामं गेली होती. त्यामुळे त्यांना खायला देखील नीट मिळत नव्हते, तेव्हा सोनूने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले होते. आता देखील तो अनेकांना मदत करत आहे. अशातच सोनू सूदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनू सूदला अलीकडील काळात मुंबई विमानतळावर स्पॉट केले होते. तिथे सोनूला बघून एक व्यक्ती त्याच्याजवळ येतो आणि त्याच्याकडे मदत मागतो. सोनू त्याची अडचण समजून घेतो आणि त्याला मदत करण्याचे वचन देतो.

सोशल मीडियावर सोनू सूदच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सोनू सूदला बघून त्याच्याकडे येतो आणि रेमेडेसिवीर इंजेक्शनबद्दल काहीतरी बोलतो. यानंतर सोनू सूद त्याचा नंबर आणि पत्ता मागून घेतो आणि त्याला नक्की मदत करेल असा शब्द देतो. त्याचा हा व्हिडिओ सध्या त्याच्या जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करत आहे.

एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “तुमच्या या चांगल्या कामात ईश्वर नेहमीच तुमच्यासोबत असेल. तुम्ही खूप ग्रेट आहात सर.” या सोबतच अनेकजण त्याच्यासोबत येऊन मदत करायचे आहे, असे देखील म्हणत आहेत.

सोनू सूदला देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याने कोरोनावर अवघ्या 7 दिवसात मात करून तो पुन्हा देश सेवेसाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्याने अनेक कोरोना रुग्णांना मदत केली आहे. एवढंच काय तर त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी ट्वीट करून सांगितले आहे की, तो एक मोफत कोव्हिड सेंटर चालू करणार आहे. त्याने एक टेम्प्लेट शेअर करून नागरिकांना संपूर्ण माहिती दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अचंबित! टायगर श्रॉफने खतरनाक स्टंट करत मारली पाण्यात उडी, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आहे ‘द कपिल शर्मा शो’ची खूप मोठी फॅन, म्हणाली…

-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

हे देखील वाचा