Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड काय बॉडी आहे राव! ट्रेडमिलवर पोज देत शर्टलेस सोनू सूदने दाखवले ‘६ पॅक अ‍ॅब्स’, फोटो पाहून चाहतेही दंग

काय बॉडी आहे राव! ट्रेडमिलवर पोज देत शर्टलेस सोनू सूदने दाखवले ‘६ पॅक अ‍ॅब्स’, फोटो पाहून चाहतेही दंग

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अनेकदा गरजू लोकांना मदत करण्यामुळे चर्चेत येत असतो. यासंदर्भातील त्याचे ट्वीट खूप व्हायरल होत असतात. तसेच सोशल मीडियावर युजर्स यावर जोरदार प्रतिक्रियाही देत असतात. मात्र, यावेळी तो दुसर्‍याच कारणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

वास्तविक, अभिनेत्याने स्वत: चा एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची जबरदस्त बॉडी दिसत आहे. सोनूच्या बॉडीचा हा फोटो चाहत्यांना इतका आवडला आहे की, तो अगदी कमी वेळात व्हायरल झाला.

सोनू सूदचा हा फोटो जिममधील वर्कआउट दरम्यान काढला गेला आहे. फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे आणि त्याचे 6 पॅक अ‍ॅब्सदेखील स्पष्ट दिसत आहेत. या फोटोत सोनू सूद ट्रेड मिलवर पडून पोज देताना दिसत आहे. त्याच्या या फोटोला काही तासांतच 7 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोनू सूद त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी ओळखला जातो. तो बर्‍याचदा त्याच्या वर्कआउटचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

सोनू सूद लोकांना शिक्षण, उपचार, काम, नोकरी आणि प्रत्येक बाबतीत मदत करताना दिसतो. सोनू सूदच्या या कामगिरीमुळे कुठे त्याची मूर्ती बनविली जाते, तर कुठे त्याची पूजा केली जाते. त्याने आपल्या कामाद्वारे बऱ्याच लोकांची मने जिंकली आहेत. लॉकडाऊन दरम्यानही सोनू सूदने लोकांना खूप मदत केली. त्याने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विमानामार्फत भारतात आणले.

त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नुकताच ‘किसान’ चित्रपट साईन केला आहे. याशिवाय लवकरच तो ‘पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोबाईलच्या दुकानाला सोनू सूदचं नाव, ‘१०० रुपयांचा रिचार्ज मिळेल का?’ म्हणत अभिनेत्याचा मजेशीर अंदाजात प्रतिसाद

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा