सोनू सूद हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे, तर तो नेहमीच अनेकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावत असतो तर सध्या अमेरिका आणि इराणमधील युद्ध सुरु आहे. त्यामुळे लोक दुबईसह अनेक ठिकाणी विमानतळांवर अडकले आहेत. तर या अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी सोनू सूद पुढे आला आहे. तो दुबईत अडकलेल्यांसाठी राहण्याची व्यवस्था करत आहे. त्याने ही माहिती इंस्टाग्रामवर एक व्हिडिओद्वारे दिली आहे आणि मानवता म्हणून हा एक प्रयत्न असणार आहे. तसेच हा मेसेज गरजूंपर्यंत पोहोचवा असे आव्हानही केले आहे.
व्हिडिओमध्ये सोनू (sonu)म्हणतो, “नमस्कार मित्रांनो. सध्याच्या संकटामुळे दुबईत अडकलेल्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला मोफत राहण्याची व्यवस्था सुनिश्चित करू. आमच्या भारतीयांसाठी किंवा दुबईमध्ये अडकलेल्या कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या लोकांसाठी, कृपया मला इंस्टाग्रामवर डीएम करा. तुम्ही तुमच्या देशात पोहोचेपर्यंत तुम्ही मोफत राहू शकाल याची आम्ही खात्री करू.
अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटिझनने लिहिले की, “मी तुमच्या मानवतेला, तुमच्या त्यागाला सलाम करतो. तुम्ही चित्रपटातील नायक नाही तर खरा नायक आहात. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, “तुमच्या दयाळूपणाला सलाम. तुमचा अभिमान आहे. कठीण काळात, तुमच्यासारखे लोक मानवतेवर विश्वास पुनर्संचयित करतात. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. दुसऱ्या एका नेटिझनने ट्विट केले की, “कोणतेही राष्ट्रीयत्व नाही. कोणत्याही अटी नाहीत. फक्त मानवता. आम्हाला अशाची आणखी गरज आहे. ईशा गुप्ता, सोनल चौहान आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दुबईमध्ये अडकल्या होत्या. तर दोन्ही अभिनेत्री आता भारतात परतल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिसेप्शनला बॉलीवूड स्टार्सने लावली हजेरी










