Saturday, July 26, 2025
Home बॉलीवूड देवमाणूस! सोनू सूदच्या चाहत्यांनी केली हद्द पार, चक्क अभिनेत्याचं मंदिर बनवून मुर्तीचे…

देवमाणूस! सोनू सूदच्या चाहत्यांनी केली हद्द पार, चक्क अभिनेत्याचं मंदिर बनवून मुर्तीचे…

बॉलिवूड आणि साउथमधील आपल्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता सोनू सूद.  कोरोना काळत लोकांच्या मदतीसाठी देवासरखा धावून आला ज्यामुळे सोनू गरिबांचा मसिहा बनला. यानंतरही अभिनेता अनेक लोकांच्या मदतीसाठी सतत उभा राहिला आहे. त्याशिवाय सोनूला चाहत्यांनी देवमाणूस असं नावही दिलं आहे. अशातच साउथमधील चाहत्यांनी चक्क सोनू सूदचे आभार मानत मंदिर बांधलं आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अभिनयापेक्षा जास्त सोशल वर्कसाठी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. सोनू सतत गरिब लोकांच्य समस्याचे निवारण करत असतो भले तो चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी ओळखला जातो मात्र, खऱ्या आयुष्यामध्ये अनेक लोकांचा रिअल हिरो आहे. त्यामुळे अभिनेत्याला जगभरातून चाहत्यांप्रती खूप प्रेम मिळतं.

सोनूच्या कारकिर्दीमुळे अनेक चाहते त्याच्यासाठी कीहीना काही करत असतात. मात्र, साउथच्या चाहत्यांनी तर हद्दच पार केली आहे. सोनूला देवमाणून म्हणाऱ्यांनी चक्क अभिनेत्याचं मंदिरच बांधलं आहे. सोशल मीडियावरील इस्टंट बॉलिवूडने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सोनू सूदच्या स्वागतासाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. अशताच सोनूचं मंदिर बांधलं असून मंदिरामध्ये सोनूचा पुतळा बनवला आहे. ज्याच्या स्वागतासाठी लाखो लोकांच्या संख्येने चाहते सोनूला भेटण्यासठी आले आहेत.

 

View this post on Instagram

 

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तर सोनू सूदचं चाहत्यांप्रती प्रेम पाहूण स्वत: अभिनेता भारावून गेला आहे. सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने साउथच नाही तर बॉलिवूडमध्येही आपलं मोलचं स्थान निर्माण केलं आहे. ‘आर राजकुमार’, ‘एंटरटेनमेंट’, ‘सिंबा’, ‘रमैया वस्तावैया’ सारख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा