माणूस एखाद्या गोष्टीला वैतागला की, काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडले आहे. टेलिव्हिजनवर सतत दाखवला जाणारा सिनेमे कोणता? असा प्रश्न जर कोणी विचारला तर बारीक मुलगा देखील याचे उत्तर देईल आणि ते म्हणजे ‘सूर्यवंशम’. सेट मॅक्स या चॅनेलवर हा सिनेमा रोजरोज दाखवला जातो. मागील अनेक वर्षांपासून हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जात आहे. या सिनेमाच्या सततच्या दाखवण्यावर अनेक मीम्स देखील तयार होतात. नेहमी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या या सिनेमाला एक व्यक्ती इतका वैतागला की त्याने थेट चॅनेललाच एक पत्र लिहून टाकले. यापत्रामध्ये त्याने विचारले आहे की, अजून किती दिवस तुम्ही आम्हाला हिरा ठाकूर आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट दाखवाल? सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
त्या व्यक्तीने या पत्रामध्ये लिहिले आहे की, “मला मान्य आहे की तुमच्या चॅनलला सूर्यवंशम चित्रपटाच्या टेलिकास्टचा हक्क मिळाला आहे. तुमच्या कृपेने मी आणि माझे कुटुंबीय हे हिरा ठाकूर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना (राधा, गौरी आणि इतर..) चांगलेच ओळखायला लागले आहेत. हा सिनेमा आता आम्हाला पूर्ण तोंडपाठ झाला आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की, आतापर्यंत तुमच्या चॅनलने हा चित्रपट किती वेळा प्रसारित केला? आणि भविष्यात आणखी किती वेळा तो दाखवला जाणार आहे? जर आमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा काही विपरित परिणाम झाला, तर त्याला कोण जबाबदार असेल? कृपया उत्तर देण्याचे कष्ट करावे”
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते तुफान गाजत असून, आता यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तत्पूर्वी सूर्यवंशम हा सिनेमा १९९९ साली प्रदर्शित झाला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?
कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा