बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ अभिनित ‘सूर्यवंशी’ चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहात धमाल करत आहे. पहिल्या दिवसानंतर, रोहित शेट्टीचा हा चित्रपट दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे. शुक्रवारी (५ नोव्हेंबर) या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटींहून अधिक कमाई केली. त्याचबरोबर चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाईही जबरदस्त आहे.
‘सूर्यवंशी’ची प्रदर्शन तारीख समोर आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे. अक्षय आणि कॅटरिनाचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते. निर्मात्यांनुसार, चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह छोट्या शहरांमध्येही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २४.५० कोटी कमावले आहेत.
अक्षय आणि कॅटरिनाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६. २९ कोटींचे कलेक्शन केले होते. दुस-या दिवशी कमाईत थोडीशी घसरण झाली असली, तरी रविवारी (७ नोव्हेंबर) मात्र चित्रपट चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे. दोन दिवसांच्या कलेक्शननुसार चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींचे कलेक्शन केले आहे. रविवारी (७ नोव्हेंबर) हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज ट्रेड तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
माध्यमांशी बोलताना, ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श म्हणाले की, “लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक चित्रपटात थोडीशी घसरण होते. यात जर काही घसरण झाली, तर ती नाममात्रच असेल, कारण चित्रपट चांगली पकड घेत आहे. चांगली गोष्ट म्हणजे कोरोनामुळे एवढ्या प्रदीर्घ शांततेनंतर एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये परतत आहेत. प्रत्येक राज्यात पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू झाली असती, तर चित्रपटाचे कलेक्शन आणखीनच वाढले असते, असा दावा त्यांनी केला.”
‘सूर्यवंशी’ भारतात ४ हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ व्यतिरिक्त रणवीर सिंग आणि अजय देवगण कॅमिओमध्ये आहेत. त्याचबरोबर गुलशन ग्रोवर, सिकंदर खेर, अभिमन्यू सिंग आणि जावेद जाफरी हे देखील चित्रपटात आहेत. ‘सूर्यवंशी’ रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार
-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण










