Saturday, June 29, 2024

56 वर्षीय साऊथ अभिनेता करणार 33 वर्षांने लहान तरुणीशी लग्न; म्हणाला,’मी अजूनही मनाने तरुण…’

साऊथचा अभिनेता बबलू पृथ्वीराज(Babloo Prithveeraj) याच्या गुपचूप लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 33 वर्षे लहान असलेल्या तरुणीशी गुपचूप दुसरं लग्न केलं अशी चर्चा होती. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा झाली. आता या प्रकरणावर आपले मौन तोडत अभिनेत्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.  

एका मुलाखतीत त्यांनी आपली बाजू मांडली जर मी, “या वयात लग्न करण्यामध्ये गैर काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अभिनेत्याने सांगितले की तो त्याच्या पत्नीपासून सहा वर्षांपासून वेगळा राहत होता आणि तीन महिन्यांपूर्वी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती. अभिनेता म्हणाला, ‘एकटेपणा हा सर्वात मोठा शाप आहे. शीतल तिच्या वयाच्या मानाने बरीच परिपक्व आहे. त्याचवेळी, ती खूप हुशार देखील आहे.असं बबलू म्हणाले.

 

View this post on Instagram

 

मुलाखतीदरम्यान अभिनेता म्हणाला, ‘गेल्या एक वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. सिनेमा, संगीत, हेल्थ, लाइफस्टाइल या सर्व गोष्टींच्या बाबतीत आमची आवड-निवड सारखीच आहे.ती जेवणसुद्धा चांगलं बनवते. “मी अजूनही मनाने तरुण आहे. मी फिट आहे. शीतलला माझ्या वयाविषयीची माहिती आहे. तिच्या कुटुंबीयांना सर्व गोष्टी माहीत आहेत. यात वाईट काय आहे?”

बबलू आणि शीतल लवकरच लग्न करणार आहेत. बबलू यांच्याविषयी शीतल म्हणाली, “ते अभिनेते आहेत हे मला आधी माहीत नव्हतं. त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर मला त्यांच्या चित्रपटांविषयी समजलं. मी त्यांची एक मुलाखत पाहिली, त्यानंतर मला त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी समजल्या.” बबलू पृथ्वीराज हे तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते आहेत. खलनायकी भूमिकांसाठी ते विशेष लोकप्रिय आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावानं दिलं पाठिंबा; म्हणाला,’तुला खूप सारं प्रेम…’

असे काय घडले की, अमिताभ बच्चन यांनी काढले बूट अन् चाहत्यासमाेर जाेडले हात

हे देखील वाचा