दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा मेगा पावरस्टार राम चरणने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग कोट्यवधींच्या घरात आहे. त्याच्याबद्दल कोणतीही गोष्ट चाहत्यांना पटकन त्याच्याकडे आकर्षित करत असते. राम चरण हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील असा कलाकार आहे ज्याने त्याच्या वडिलांच्या प्रसिद्धीचा कोणताही फायदा न घेता सर्वत्र नाव कमावले आहे आहे. आज रामचरण आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यावर चाहत्यांसोबतच कलाकारांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. राम हा अभिनयासोबतच त्याच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीमुळे देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज त्याच्या वाढदिवसाबद्दल आपण त्याच्या संपत्तीवर नजर टाकणार आहोत.
राम चरण याचा जन्म 27 मार्च 1985 साली चेन्नईमध्ये झाला होता. त्याने सन 2007 मध्ये ‘चिरुथा’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच्याकडे हैदराबाद येथील जुबली हिल्स प्राईम लोकेशनला 38 कोटींचा बंगला आहे. तिथे तो त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याचा हा बंगला एवढा शानदार आहे की, या बंगल्याला बघायला त्याचे चाहते त्याच्या घरी जातात.
माध्यमांतील वृत्तानुसार, राम चरणचा हा बंगला साऊथ मधील सगळ्या कलाकारांच्या घरांपेक्षाही महागडा आहे. त्याच्या घरातील भींतींवर महागड्या पेंटिंग्ज लावल्या आहेत.
अभिनयासोबत राम एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. त्याने 2012 मध्ये ‘उपासना कमिनेनी’ हिच्यासोबत लग्न केले होते. त्याने 2016 मध्ये स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस चालू केलं. ज्याचं नाव कोन्नीडेला प्रॉडक्शन कंपनी हे आहे.
राम चरण हैद्राबादमधील बेस्ट एअर लाईन ट्रे जेटचा मालक आहे. या व्यतिरिक्त त्याची राम चरण हैद्राबाद पोलो रायडिंग क्लब नावाने पोलो टीम आहे. चित्रपटा व्यतिरिक्त तो ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणुकीतून खूप पैसा कमावतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित