Monday, July 1, 2024

काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा अपघात झाला आहे. शुक्रवारी १० सप्टेंबरला रात्री बाईक घसरल्यामुळे त्याचा अपघात झाला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातानंतर साई धरम तेजच्या टीमकडून एक संदेश जाहीर करण्यात आला आहे. यात त्यांनी साई धरम तेजच्या प्रकृतीबद्दल सांगताना त्याची तब्येत ठीक असून, त्याच्यावर सध्या उपचार चालू आहे. साई धरम तेज उपचारानं योग्य तो प्रतिसादही देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

साई बाईकने जात असताना त्याची गाद घसरली मात्र त्याने हेल्मेट घातले असल्याने त्याला डोक्यावर कोणतीही जखम झाली नसल्याचे सांगितले आहे. साईचा अपघात साइबरबादच्या आयकॉनिक ब्रिजजवळ झाला. जुबिली हिल्स आणि IKEA स्ट्रेच दरम्याने त्याच्या बाईकचे संतुलन बिघडल्याने त्याच्या अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच त्याचे मामा अभिनेता पवन कल्याण आणि इतर अभिनेते मित्र यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.

साई हा साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा भाचा असून, अभिनेता अल्लू अर्जुन, रामचरण, अल्लू शिरीष, वरुण तेज हे त्याचे चुलत भावंडं आहेत. साईने २०१४ साली Pilla Nuvvu Leni Jeevitham या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर तो Subramanyam for Sale, Supreme, Solo Brathuke So Better, Rey, Winner, Thikka, Nakshatram आदी चित्रपटांमध्ये झळकला. चित्रपटांची पार्श्वभूमी असूनही त्याला या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्याने २०१६ साली थिक्क, विनर, नक्षत्रम, जवान, तेज-आई लव यू, इंटेलिजेंट २०१६ पासून सलग सहा चित्रपट फ्लॉप दिले होते. असे असूनही तो एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

-‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर एका चाहतीच्या वागण्यामुळे, ‘बिग बीं’चे वैवाहिक जीवन आले धोक्यात

प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा