दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता चियान विक्रम याची अचानक तब्येत बिघडली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याला तातडीने चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशात विक्रमच्या तब्येतीबाबत ऐकून चाहतेही निराश झाले आहेत. चाहतेही त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
विक्रमची तब्येत बिघडली
सुपरस्टार चियान विक्रम (Chiyaan Vikram) याच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शुक्रवारी (दि. ०८ जुलै) विक्रमची तब्येत अचानक खराब (Chiyaan Vikram Hospitalized) झाली. यानंतर विक्रमला रुग्णालयात नेण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, विक्रमच्या छातीत मागील एक दिवसापासून त्रास होत होता. मात्र, शुक्रवारी त्याची तब्येत खूपच बिघडली. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रमला हृदयविकाराच्या झटक्याची तक्रार सांगितली गेली आहे. या बातमीमुळे सोशल मीडियावर विक्रम बरा होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Dear fans and wellwishers,
Chiyaan Vikram had mild chest discomfort and is being treated for the same. He DID NOT have a heart attack as reports falsely claim. We are pained to hear rumours to this effect.
That being said, we request you to give him 1/2— Suryanarayanan M (@sooriaruna) July 8, 2022
विक्रमचा आगामी सिनेमा
विक्रमचे नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील निवडक सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. विक्रमची तब्येत बिघडल्यामुळे त्याच्या आगामी सिनेमांच्या चर्चांनी जोर धरला आहे. विशेष म्हणजे, विक्रम हा प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमाच्या पहिल्या भागात झळकणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमातील विक्रमचा लूक नुकताच जाहीर करण्यात आला होता.
या सिनेमात विक्रमसोबत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) याची मुख्य भूमिका आहे. खरं तर, ‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.
विक्रमची कारकीर्द
विक्रम हा भारतीय सिनेअभिनेता, व्हॉईस कलाकार आणि पार्श्वगायक आहे. १९९०च्या ‘एन कादल कानमानी’ या सिनेमातून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर त्याने तमिळ आणि तेलुगू सिनेमाच्या मालिका आणि सुरुवातीच्या दशकात काही मल्याळम सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्याने आतापर्यंत ५०हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यात ‘सेतू’, ‘हाऊस फुल’, ‘रेड इंडियन्स’, ‘समुराय’, ‘आय’, ‘स्केच’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा ‘रिक्षावाला हिरो व्हायला आलाय’ म्हणत अभिनेता धनुषचा केला होता अपमान, वाचा रंजक किस्सा