Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण, ओळखणे झाले कठीण; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

आजकाल रिलेशनशिप संबंधित अनेक प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. कधी मुलीचा मृतदेह फ्रीजमध्ये सापडतो तर कधी शारीरिक शोषणाच्या घटना घडत आहे. अशा परिस्थितीत मल्याळम अभिनेत्री अनिका विक्रमन हीच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. अभिनेत्रीच्या पुर्व प्रियकराने तिला बेदम मारहाण केली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमन (Anicka Vikhraman) हिने सोशल मीडियावर धक्कादायक फोटो शेअर केले आहेत. हे शेअर करण्यासोबतच तिने आपली व्यथा मांडली आहे. हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसेल. या फोटोंमध्ये अनिकाचे डोळे, तोंड सुजले असून तिच्या चेहऱ्यावर जखमाही दिसत आहेत. लोक तिला सतत विचारत आहे की हे कसे आणि का झाले, कोणी केले? अनिकाने सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणाची एक लांबलचक नोटही शेअर केली आहे.
अनिकाने तिचे वाईट अवस्थेतील फोटो तिच्या सोशल मिडियाच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच   तिने एक लांबलचक नोटही शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिची दुर्दशा सांगितली आहे. या अवस्थेसाठी तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला जबाबदार धरले आहे. हे फोटो पाहून चाहत्यांचीच नाही तर कोणाचीही चिंता वाढेल. फोटो पाहून ती अनिका असल्याचा अंदाज लावणे कठीण होत आहे. बॉयफ्रेंड अनूपचा निर्दयीपणा फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे.
पोस्ट शेअर करण्यासोबत अनिकाने लिहिले की, ‘माझ्यासोबत जे काही घडले, ते सोडून गेल्यानंतरही मला सतत धमकीचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली जात आहे. अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीसोबत मी काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. त्याने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नव्हता. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, तो माझ्यासोबत असे करेल.
अनिकाने (Anicka Vikhraman) शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘जेव्हा पहिल्यांदा त्याने मला मारले, त्यावेळी आम्ही चेन्नईमध्ये होतो. त्याच्या या कृत्यानंतर त्याने माझ्या पाया पडून माफी मागितली.  त्याला क्षमा करुन मी मूर्खपणा केला. दुसऱ्यांदा त्यांनी मला बेंगळुरूमध्ये मारहाण केली. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र त्यांने पोलिसांना पैसे देऊन प्रकरण मिटवण्यास सांगितले होते.  त्यामुळे त्याच्यात पुन्हा माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत आली. म्हणुन आता अभिनेत्रीची अशी अवस्था पाहायला झाली आहे.

आनिका विक्रमन ही मल्याळम चित्रपट जगतातील एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे. तिचा जन्म बंगलोर येथे झाला. तिने  ‘विशमकरन’, ‘आईकेके’ आणि ‘एंगा पट्टन सोथू’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. (south-actress-anicka-vikraman-assaulted-by-ex-boyfriend)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पोलादाहून मजबूत आणि मेणाहून मऊ’ किरण माने यांनी महिला दिनाच्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी होळीच्या जुन्या आठवणी शेअर करत सांगितली मनातली गोष्ट; एकदा वाचाच

हे देखील वाचा