बॉलिवूडमध्ये आज नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, असे अनेक दिग्गज कलाकार आहेत जे अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशा कलाकारांनी त्यांच्या मोठ्या करियरमध्ये २००/२५० सिनेमे केले आहेत. काही कलाकार याला अपवाद देखील आहेत, ज्यांनी अधिक सिनेमे केले. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांची कारकीर्द १५०० चित्रपटांनी सजवली आहे. या अभिनेत्री होत्या मनोरमा. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सुपरस्टार म्हणून मनोरमा यांची ओळख होती. मनोरमा यांनी त्यांच्या करियरमध्ये १५०० सिनेमे आणि ५००० पेक्षा अधिक स्टेज शो केले आहेत. ‘आची’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मनोरमा या चित्रपटांमधील टॉपच्या कॉमेडियन होत्या. यासोबतच अनेक टीव्ही शोमध्ये देखील त्या झळकल्या होत्या. १५०० सिनेमे केल्यामुळे त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

मनोरमा यांचा जन्म २६ मे १९३७ साली तामिळनाडूमध्ये झाला. मनोरमा यांचे खरे नाव ‘गोपीशांता’ होते. स्टेज आर्टिस्ट म्हणून त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर चित्रपटांमध्ये त्यांनी ते करून दाखवले जे कोणालाही शक्य नाही. त्यांचे यश त्यांची सफलता जरी आभाळापेक्षा मोठी असली तरी, ही वाट त्यांच्यासाठी वाटते तितकी सोपी कधीच नव्हती. त्यांनी त्या काळी सिनेमात काम करायला सुरुवात केली, जेव्हा स्त्रियांनी बाहेर पडून काम करावे हे चुकीचे मानले जायचे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संघर्ष करत यश संपादन केले. (south actress manorama)
घरात आई आजारी असल्याने त्यांना वयाच्या ११ व्या वर्षी शाळा सोडून लोकांच्या घरी काम करावे लागले. त्या एक नोकरानी बनून लोकंच्या घरातील सर्व कामं करायच्या आणि मिळालेल्या पैशांवर त्यांचा चरितार्थ चालायचा. त्यांची आई देखील त्यांना जमेल तसे लोकांच्या घरी जाऊन काम करायची. मात्र त्यांचे नशीब बदलले आणि त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली. १९५८ साली ‘मालाइट्टा’ या तामिळ सिनेमातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

मनोरमा यांना विनोदी अभिनेत्री म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की, “जर मी फक्त अभिनेत्री असती तर मी खूपच लवकर या इंडस्ट्रीमधून बाहेर झाली असती. म्ह्णूनच मी कॉमेडी कलाकार होण्याचे ठरवले. एकवेळ रडवणे खूप सोपे आहे, मात्र हसवणे तितकेच अवघड. जवळपास पाच दशकं मी हास्य कलाकार म्हणून कामं केले.”
वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा सुरु झालेला हा प्रवास वयाच्या ७६ व्या वर्षीपर्यंत सुरु होता. या संपूर्ण प्रवासात त्यांनी अभिनय आणि तर केलाच सोबत अनेक चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली. मात्र जेव्हा त्या आजारी पडल्या तेव्हा त्यांचे सिनेमांमधील कामं कमी झाले किंबहुना थांबले. २०१३ साली त्या खूप आजारी पडल्या आणि दोनच वर्षात २०१५ साली त्यांचे निधन झाले. त्यांना त्यांच्या या मोठया उपलब्धीसाठी पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार शिवाय इतर अनेक पुरस्कर त्यांना दिले गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?

