दाक्षिणात्या अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे काही बोलले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या वक्तव्यात अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांच्या पलायनाची तुलना गोरक्षणाशी केली. या वक्तव्यानंतर साईवर सर्वत्र टीका होत आहे. अशा परिस्थितीत, आता या संपूर्ण वादावर अभिनेत्रीने आपले वक्तव्य जारी करत लोकांची माफी मागितली आहे.
साई पल्लवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने या संपूर्ण वादावर मौन सोडले आहे. साईने या वादावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, तिच्या विधानाला तोडून-मोडून सादर करण्यात आले असून, तिने तिच्या उत्तरात काहीही चुकीचे बोलले नाही. तिच्या वक्तव्याला चुकीच्या दिशेने नेले असून, त्यामुळे तिचे खूप नुकसान झाले आहे. (south actress sai pallavi reaction on kashmiri pandit controversial statement)
अभिनेत्रीने स्पष्टीकरण देताना म्हटली की, “मी पहिल्यांदाच तुम्हा सर्वांशी अशा प्रकारे बोलत आहे. मला तुमच्याशी काहीतरी स्पष्ट करायचे आहे. नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे. मी कबूल करते की, मी माझे म्हणणे मांडण्यासाठी बराच वेळ घेतला आहे. पण मला माफ करा, माझा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे. शेवटच्या मुलाखतीत मला एवढेच सांगायचे होते की, धर्माच्या नावावर कोणताही वाद होणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तटस्थ राहून माझे उत्तर दिले. मला आश्चर्य वाटते की, माझे शब्द अशा प्रकारे दाखवले गेले आहेत. मुलाखतीत सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्या आहेत.”
काय म्हणाली होती साई?
दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवर दाखविण्यात आलेल्या अत्याचाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली. अभिनेत्री पुढे म्हणाली की, “काश्मिरी पंडितांना त्यावेळी कसे मारले गेले, हे काश्मीर फाइल्स दाखवते. जर तुम्ही हा मुद्दा धार्मिक संघर्ष म्हणून घेत असाल, तर अलीकडेच एका मुस्लिमावर हल्ला झाला होता. तो गाडी चालवत असताना हा हल्ला झाला होता, जेव्हा तो गायी घेऊन जाणारे वाहन नेत होता आणि लोकांनी जय श्री रामचा जयघोष केला. मग तेव्हा जे झाले आणि आता जे होत आहे, यात फरक काय?” तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युजर्स दोन भागात विभागलेले आहेत. एकीकडे काही लोक साई पल्लवीला सपोर्ट करत असताना, दुसरीकडे काही यूजर्स तिच्यावर भडकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










