Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा समंथा आणि नागा यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर, ‘अशी’ होती अभिनेत्रीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

समंथा आणि नागा यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर, ‘अशी’ होती अभिनेत्रीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोट झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांसह, कुटुंब देखील    दु:खी झाले आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. या घटस्फोटावर नागाच्या वडिलांनी अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली. आता समंथाच्या वडिलांनी देखील या घटस्फोटावर त्यांचे मत मांडले आहे.

समंथा आणि नागा चैतन्य साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी होती. समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. त्यांचं कुटुंबाला देखील दु:ख झाले. समंथा आणि नागा चैतन्याच्या कुटुंबासाठी ही बातमी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. समंथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, “जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हा माझे मन स्तब्ध झाले. मी ब्लँक झालो. मला आशा आहे की लवकरच गोष्टी चांगल्या होतील.” या निर्णयाने समंथाच्या वडिलांना धक्का बसला असला तरी, प्रभू म्हणाले की, “मला खात्री आहे की माझ्या मुलीने तिचा हा एवढा मोठा निर्णय पूर्ण विचारांती घेतला असेल. हा निर्णय ऐकल्यावर मी सुन्न झालो होतो. आशा आहे की लवकरच या गोष्टी ठीक होतील. मी समंथाला तिच्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करण्यास देखील प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.”

https://www.instagram.com/p/BhAUprOHeML/?utm_source=ig_web_copy_link

समंथा आणि नागा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या वेगळे होण्याची बातमी देताना लिहिले की, “खूप विचार केल्यानंतर, आम्ही पती -पत्नी म्हणून आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, एक मैत्री आमच्या नात्याचा पाया होती. आम्हाला विश्वास आहे की आमच्यातील हे मैत्रीचे नाते कायम राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी आमच्या खासगी आयुष्याचा आदर ठेवा.”

ही पोस्ट शेअर केल्यानंतर, समंथाने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नाव बदलून समंथा रथ प्रभू ठेवले. दोघांमधील तणावाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. समंथा तिच्या सासऱ्याच्या नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित नव्हती. एवढेच नाही तर तिने नागाच्या ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीपासून स्वतःला दूर ठेवले.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा