Friday, July 18, 2025
Home बॉलीवूड साउथच्या तीन सिनेमांनी मिळवले तब्बल 3000 कोटी – आता दुसऱ्या भागांची वाट पाहतेय सगळी दुनिया!

साउथच्या तीन सिनेमांनी मिळवले तब्बल 3000 कोटी – आता दुसऱ्या भागांची वाट पाहतेय सगळी दुनिया!

पुढच्या काही वर्षांत साउथचे असे काही भन्नाट चित्रपट येणार आहेत,ज्यांनी साउथ चित्रपटला थेट जागतिक पातळीवर पोहोचवलंय.त्यातला एक चित्रपट तर इतका जबरदस्त ठरला की,आजवर एकाही हिंदी चित्रपटला तो रेकॉर्ड तोडता आला नाही!

गेल्या काही वर्षांत साउथच्या अनेक चित्रपटांनी फक्त भारतातच नाही,तर जगभरात धमाल केली आहे.प्रभास आणि अल्लू अर्जुन यांसारख्या सुपरस्टार्सच्या चित्रपटनी पहिल्याच भागात जबरदस्त कमाई केली. मग अ‍ॅक्शन असो,दमदार डायलॉग्स असोत किंवा गोष्ट साउथच्या या चित्रपटनं प्रेक्षकांचं मन जिंकलंय.या चित्रपटांनी फक्त भारतातच नाही,तर सगळ्या जगातल्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे.आता या चित्रपटाचे पुढचे भाग कधी येणार,याची सगळे जोरदार आतुरतेने वाट पाहत आहेत. लक्षात ठेवा,पुढे ज्या तीन चित्रपटांबद्दल आपण बोलणार आहोत,त्यांनी मिळून तब्बल 3000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे!

कल्कि 2898 एडी 2
प्रभास,दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा ‘कल्कि 2898 ए.डी’. हा चित्रपट भन्नाट सायन्स फिक्शन आहे. तब्बल 600 कोटी खर्चून बनवलेला हा चित्रपट खूप मोठा प्रोजेक्ट होता.आणि त्याने वर्ल्डवाइड 1042.25 कोटींची कमाई केली! चित्रपटातले VFX, भव्य सेट्स आणि वेगळीच कल्पना सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडल्या.

सालार
‘सालार’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो प्रशांत नीलने दिग्दर्शित केला होता.टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,या सिनेमाचं बजेट सुमारे 270 कोटी होतं आणि त्याने जगभरात 404.87 कोटींची कमाई केली. प्रभासचा हा अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांनी खूपच आवडला.या चित्रपटामुळे प्रभास पुन्हा एकदा टॉपच्या अ‍ॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांसमोर उभं केलं.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटने साउथ चित्रपटला एक वेगळीच ओळख दिली.सुमारे 400 ते 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटने तब्बल 1740.95 कोटींची कमाई केली आणि हा एक भन्नाट विक्रम ठरला. आता ‘सालार 2’, ‘कल्कि 2’ आणि ‘पुष्पा 3’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये भारी चर्चा सुरू आहे. ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’ 2028 मध्ये येणार असल्याची घोषणा आधीच झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ‘सालार 2’ 2026 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

‘कल्कि 2898’चे डायरेक्टर नाग अश्विन यांनी सांगितलं होतं की,दुसऱ्या भागाचं शूटिंग डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणार आहे.मात्र या चित्रपटांची रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही,पण लवकरच काहीतरी मोठं अपडेट येण्याची शक्यता आहे.या तिन्ही चित्रपटांनी इतकी कमाई केली आहे की,आता फॅन्सना त्याच्या सिक्वेल्सकडून अजून मोठा धमाका होईल,अशी भारी अपेक्षा आहे.सोशल मीडियावर लोक सतत या सिनेमांच्या अनाउन्समेंटची वाट पाहत आहेत आणि म्हणत आहेत की हे चित्रपट येत्या काळात हजारो कोटींचा गल्ला जमवतील!

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

कोल्डप्लेच्या कॉन्सर्ट दरम्यान टेक कंपनी अ‍ॅस्ट्रोनॉमर सीईओच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा

हे देखील वाचा