दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा एक असा कलाकार आहे, ज्याने खूप कमी वयात प्रेक्षकांच्या मनात आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. विजयने अनेक हिट आणि संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. आज विजयच्या सुंदर अभिनयामुळे त्याचे केवळ दक्षिणच नव्हे, तर सर्वत्र चाहते पसरलेले आहे. मंगळवारी (9 मे) विजय आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित मनोरंजक गाेष्टी जाणून घेऊया…
विजय देवरकोंडाचा जन्म 9 मे, 1989 रोजी हैदराबाद येथे एका तेलुगु कुटुंबात झाला आहे. विजयचे वडील देवरकोंडा गोवर्धन राव, हे दक्षिण भारतीय स्टार आहेत. विजयला घरी राऊडी म्हणतात, आणि त्यामागे एक अतिशय मनोरंजक कारण आहे. खरं तर, विजय त्याच्या बालपणी खूप बोचरा बोलणारा होता, आणि म्हणूनच घरातील सदस्यांनी त्याचे नाव राऊडी ठेवले होते. कोणीही त्याला घरी विजय म्हणत नाही.
चित्रपटांत येण्यापूर्वी विजयला खूप संघर्ष करावा लागला होता. जेव्हा तो स्ट्रगल करत होता, तेव्हा त्याच्याकडे भाडे देण्याचे पैसे नव्हते. पण त्याने हिंमत कधीच हारली नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज तो दक्षिण भारतीय चित्रपटाचा सुपरस्टार आहे, आणि करोडो रूपये कमावतो.
सन 2011मध्ये विजयने आपल्या करिअरची सुरुवात नुव्विला या चित्रपटाद्वारे केली होती. नुव्विलानंतर विजयने ‘डियर कॉम्रेड’, ‘मेहानी’ आणि ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अर्जुन रेड्डी या चित्रपटाच्या जबरदस्त कामगिरीने चित्रपटाला रातोरात हिट केले होते. 2015 सालच्या येवाडे सुब्रमण्यम मधील भूमिकाही त्याला खूप मोठी प्रसिद्धी देऊन गेली. विजनने 2016साली तेलुगु ब्लॉकमास्टर रोमँटिक विनोदी चित्रपट पेली चोपुलु मध्ये काम केले. ज्यानंतर त्याला खूप पुरस्कार मिळाले होते.
विकला फिल्मफेअर अवॉर्ड
‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटासाठी विजयला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराचा त्याने 25लाख रुपयांमध्ये लिलाव केला, आणि त्या पुरस्कारामधून मिळालेली रक्कम, मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीत दान केली.
प्रत्येकाला माहित आहे की, विजय एक हुशार अभिनेता आहे. परंतु तो चित्रपट निर्माताही आहे, हे काही लोकांना ठाऊक नाही. हिल एंटरटेनमेंट असे त्याच्या कंपनीचे नाव आहे. याशिवाय विजयचा स्वतःचा राऊडी वेअर नावाचा कपड्यांचा ब्रँडही आहे.
विजयने मॅडम मीरेन्ना या लघुपटाचे दिग्दर्शन फक्त 5तासांत केले होते. त्याने तो स्वत: चे काम म्हणून बनवला होता. आत्ताच दिग्दर्शक होण्याची त्याची कोणतीही योजना नाही. त्याला फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
विजयला एक मोठा दिलदार व्यक्ती देखील म्हटले जाते. एकदा, त्याच्या वाढदिवशी त्याने आईस्क्रीमचे 3 ट्रक घराबाहेर आलेल्या चाहत्यांना पाठविले होते, जेणेकरुन चाहत्यांना उन्हात त्रास होऊ नये.
विजयकडे आहेत या महागड्या गाड्या
विजय देवरकोंडाकडे काही महागड्या गाड्या पण आहेत. त्यातली फोर्ड मस्टँग ही 75लाखाची गाडी त्याची फार आवडती आहे. तसेच विजयाकडे बी.एम. डब्ल्यू 5 सीरिज, आणि मर्सिडिस बेंझ जी.एल.सी क्लास ही कारही आहे. तो रोजच्या कामासाठी आणि शूटिंगसाठी या गाड्या वापरत असतो.
बॉलिवूडमध्ये करणार प्रवेश
विजय आता ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटाद्वारे विजयसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असणार आहे. विजयच्या या चित्रपटाची चाहत्यांची बरीच प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे विजयने करण जोहरसोबत 3 चित्रपटांसाठी तब्बल 100 कोटी रुपये घेतले आहेत. आता हे पाहावे लागेल की, विजय दक्षिणेप्रमाणे बॉलिवूडमध्ये यश मिळवेल की नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day Special: नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश
नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘बबुआ’ बनून केली मस्ती, रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज