Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘दृश्यम २’ नंतर मोहनलाल दिसणार ‘या’ चित्रपटात; फर्स्ट लूक पोस्टर पाहून ‘लॉकेट’वर खिळले चाहत्यांचे लक्ष

दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांनी बुधवारी (१० नोव्हेंबर) त्यांच्या ‘मॉन्स्टर’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. यासोबतच ‘दृष्यम २’ फेम मोहनलाल यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाचे शीर्षक आणि फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित केला आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये सुपरस्टार मोहनलाल एका शीखच्या भूमिकेत दिसत आहेत. पोस्टरमध्ये मोहनलाल टेबल-खुर्चीवर पिस्तुल आणि कारतुसे घेऊन बसलेले दिसत आहेत. यासोबतच त्यावर ठळक अक्षरात ‘मॉन्स्टर’ असे लिहिले आहे.

चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा पोस्टर प्रदर्शित करताना मोहनलाल यांनी लिहिले की, “माझा आगामी चित्रपट ‘मॉन्स्टर’ आणि त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करत आहे. याचे दिग्दर्शन विशाख यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा उदय कृष्ण यांनी लिहिली असून, आशीर्वाद सिनेमाच्या बॅनरखाली ‘अँटोनी पेरुम्बावूर’ निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे.”

मोहलाल यांचे नाव असेल ‘लकी सिंग’
विशेष म्हणजे या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये मोहनलाल यांनी चित्रपटातील त्यांच्या पात्राचे नावही जाहीर केले आहे. या चित्रपटातील मोहनलाल यांच्या पात्राचे नाव ‘लकी सिंग’ असणार आहे. त्याची माहिती प्रसिद्ध पोस्टरमध्येच देण्यात आली आहे. मोहनलाल यांनी त्यांच्या पात्राच्या गेटअपमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या नावाचे पहिले अक्षर एल असलेले लॉकेट देखील घातले आहे. जे सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच काही लोक या चित्रपटाला आतापासून ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. याच कारणामुळे ‘दृश्यम २’ ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून मोहनलाल यांना चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया मिळत आहेत.

मोहनलाल या चित्रपटांमध्ये आहेत व्यस्त
मोहनलाल सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. यामध्ये ‘मरक्कर’, ‘अराटू’, ‘राम’, ‘12 th मॅन’, ‘ब्रो डॅडी’ आणि ‘अलोन’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मोहनलाल यांच्या या सर्व चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा